विमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमा
विमा

विमा

sakal_logo
By

rat३०८.TXT

बातमी क्र. ८ ( टुडे पान २ )


- rat३०p२३.jpg-
७९२३०
विमा ग्रामजक धनादेश स्वीकारताना गोळप ग्रामपंचायतीच्या सरपंच

गोळप ग्रामपंचायत बनली विमा ग्राम

रत्नागिरी, ता. ३० ः एल आय सी ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेतील (विभाग कोल्हापूर) गोळप ग्रामपंचायतीला विमा ग्राम म्हणून गौरविण्यात आले आहे. हा सन्मान २०२१-२२ या आर्थिक वर्षातील आहे. विमा ग्राम म्हणून एक लाखाचा धनादेश भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखाधिकारी सुशांत देशपांडे, उपशाखाधिकारी संतोष चौधरी, श्रीकांत फगरे, विमा प्रतिनिधी पारस पावसकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीला देण्यात आला.

याप्रसंगी गोळप ग्रामपंचायतमधील सीमा सत्यवान सुर्वे, दिशा दिलेश सुर्वे, जयेंद्र यशवंत घवाळी, उमेश सदानंद सोलकर, रिया राजेंद्र सुर्वे, तेजस कांबळी या सहा कुटुंबियांना विमा परिवार या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांनी विमा प्रतिनिधी पारस पावसकर यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी गोळप ग्रामपंचायत सरपंच मिताली भाटकर, उपसरपंच जीगर्मिया पावसकर, ग्रामपंचायत सदस्य व व्यावसायिक संदीप तोडणकर, वैभव वारीशे, रुणाली राड्ये, प्रियांका सुर्वे, समीक्षा शेडगे, प्रिया राड्ये, अविनाश काळे, मानसी गार्डी यांच्यासह विमा प्रतिनिधी उत्तम जैन, संतोष आंब्रे, अजित बोंबले, प्रसाद मोहिते, जावेद मेमन, रुपेश बोरकर उपस्थित होते.