
मनसेचे नूतन पदाधिकारी व नवनिर्वाचित ग्रा. सदस्यांचा सत्कार
rat३०२८.txt
बातमी क्र..२८ ( पान २ )
rat३०p३९.jpg ः
७९२४८
गुहागर ः मनसेचे नूतन पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मनसेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
गुहागर, ता. ३० ः घराघरात मनसे पोहोचवण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांनी करावे, निवडून आलेल्या प्रभाग सदस्यांनी प्रभागामध्ये नागरिकांसाठी काम करायचे आहे. प्रभागातील समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यांनी मासिक व ग्रामसभेला उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न मांडावेत असे आवाहन तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर तालुक्यातील नूतन पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा शृंगारतळी येथील गुहागर तालुका मनसे संपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी गुहागर तालुक्यातील मनसेचे ग्रामपंचायत सदस्या निवडून आलेल्या वैभवी जानवळकर ( ग्रा. जानवळे), रजनी कदम, वर्षा शितप, सचिन जोयशी, विनेश तांबे (ग्रा. कौंढर काळसूर) या सर्व सदस्यांचा अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांच्या नेतृत्वाखाली रानवी शाखाध्यक्ष सुहास चोगले, पिंपर शाखाध्यक्ष राकेश मोरे, वेलदुर शाखाध्यक्ष सिद्धांत पाटील, कौंढर गट अध्यक्ष सचिन जोयशी यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर शिरगावकर, उपतालुकाध्यक्ष सचिन जोयशी, शाखाध्यक्ष सुनील मुकनाक, ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक विक्रम जोयशी, राहुल जाधव, विवेक जानवळकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
---