धनश्री गोखले, डॉ. आश्विनी गणपत्येचा आगळा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनश्री गोखले, डॉ. आश्विनी गणपत्येचा आगळा विक्रम
धनश्री गोखले, डॉ. आश्विनी गणपत्येचा आगळा विक्रम

धनश्री गोखले, डॉ. आश्विनी गणपत्येचा आगळा विक्रम

sakal_logo
By

rat३०३५.txt

( पान ५ अॅंकर)

फोटो - RATCHL३०५.JPG ः
७९२९५
चिपळूण ः ८०० किमीचा प्रवास करणाऱ्या डॉ. आश्विनी गणपत्ये व धनश्री गोखले.

धनश्री गोखले, डॉ. आश्विनी गणपत्येचा विक्रम

सायकलने ८०० किलोमीटरचा प्रवास ; कोकणातल्या पहिल्या खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः सध्याच्या धावपळीच्या युगात शारीरिक तदुंरुस्तीसाठी सायकलिंगचे प्रमाण वाढले आहे. यातूनच जिद्द, चिकाटीच्या जोरावर चिपळुणातील दोन महिलांनी धाडसाने सायकलने ८०० किमीचा यशस्वी प्रवास केला. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत त्यांनी प्रवास केला. एवढ्या लांब पल्ल्याचे अंतर सायकलने पार करणाऱ्या या कोकणातील या दोघीजणी पहिल्याच असून त्यांच्या या धाडसाचे चिपळूणवासीयांकडून विशेष कौतुक होत आहे.

चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्य असलेल्या धनश्री गोखले व डॉ. आश्विनी गणपत्ये यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलने पवास करण्याचा निर्णय घेतला. ठाणे ते अहमदाबादच्या दिशेने जाणारा हा एक्स्प्रेस हायवेलगत असून, त्यावरून भरधाव वेगात जाणारी वाहने शिवाय बोचरी थंडी आणि सततची वर्दळ अशी स्थिती असते. गोखले व गणपत्ये यांनी २१ जानेवारीला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी''च्या दिशेने सायकलने प्रवास सुरू केला. त्यांचा खरा प्रवास ठाण्यातून सुरू झाला. दररोज त्या दीडशे कि. मी. चे अंतर सायकलने पार करायच्या. ठाणे, वापी, अंक्लेश्वर त्यानंतर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी'' अशा टप्प्यात त्यांच्या प्रवासाचे नियोजन होते. अखेर तीन दिवसांनी २३ जानेवारीला त्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी'' या ठिकाणी जाऊन पोहचल्या.
धनश्री गोखले यांनी यापूर्वी अहमदाबाद एक्स्प्रेस हायवेवरून सायकलने प्रवास केल्याने तो अनुभव त्यांच्याजवळ होता. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी'' पर्यंत पोहचल्यावर धनश्री गोखले व डॉ. आश्विनी गणपत्ये यांच्या चेहऱ्यावर आपले ध्येय गाठल्याचे अनोखे समाधान उमटले. त्यानंतर पुन्हा त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर त्या दोघी चिपळुणात येताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तब्बल ८०० किलोमीटरचे अंतर त्यांनी सायकलने पार केले. या प्रवासाबाबत गोखले यांनी सांगितले, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी''पर्यंत सायकलने जाण्याचा प्रवास अनुभव अभूतपूर्व होता. इतक्या दूरवरचा प्रवास सायकलने पार करण्यासाठी निश्चित सराव हवाच. यासाठी चिपळुणातील ग्रामीण भागातील रस्त्याचा आधार घेतला. महिलादेखील सायकलने इतक्या दूरवर प्रवास करू शकतात, हे यातून सिद्ध झाले. चिपळुणात इतर महिलांनीदेखील सायकलिंग करावे. यासाठी एक महिलांचा सायकलिंग क्लब आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.