Sat, March 25, 2023

मालवाहू टेम्पोला माजगावात अपघात
मालवाहू टेम्पोला माजगावात अपघात
Published on : 30 January 2023, 3:07 am
swt3033.jpg
79346
माजगावः अपघातग्रस्त टेम्पो.
मालवाहू टेम्पोला माजगावात अपघात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३०ः माजगाव गरड परिसरातील मशिदी समोरील वळणावर मालवाहक टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ही घटना सोमवारी पहाटे दीड वाहण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चालक बचावला. टेम्पो माजगावहून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी गरड परिसरातील मशिदीसमोर आला असता समोरून येणाऱ्या भरधाव गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात तो गटारात उलटला.