मालवण तालुक्यात 99.1 टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण तालुक्यात 99.1 टक्के मतदान
मालवण तालुक्यात 99.1 टक्के मतदान

मालवण तालुक्यात 99.1 टक्के मतदान

sakal_logo
By

swt३०३५.jpg
७९३५५
मालवण ः येथे सोमवारी कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील बुथला आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली.

मालवण तालुक्यात
९९.१ टक्के मतदान
शिक्षक मतदारसंघ ः २०२ जणांनी बजावला हक्क
मालवण, ता. ३० : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मालवण तालुक्यातील ४ मतदान केंद्रावर एकूण २०४ शिक्षक मतदारांपैकी २०२ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात ९९.०१ टक्के मतदान झाले.
बाळासाहेबांची शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. तालुक्यातील चार मतदान केंद्रापैकी मालवण केंद्रावर १०० पैकी ९९, आचरा केंद्रावर ३८ पैकी ३८, मसुरे केंद्रावर १४ पैकी १४, कट्टा केंद्रावर ५२ पैकी ५१ शिक्षक मतदारांनी मतदान केले. तालुक्यातील सर्व मतदान केंद्र बाहेरील बुथवर भाजपा युती पदाधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. येथील मतदान केंद्राबाहेर भाजप युती बुथवर भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत गणेश कुशे, विजय केनवडेकर यांच्याकडून मतदानाचा आढावा घेतला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, देविदास वेरलकर व अन्य उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील यांनी दुपारी बुथवर भेट देत आढावा घेतला. यावेळी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, दीपक देसाई, नरेश हुले, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, बाबू डायस, बंडू चव्हाण आदी उपस्थित होते.