कातकरी भगिनींचा कुडाळमध्ये सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कातकरी भगिनींचा कुडाळमध्ये सन्मान
कातकरी भगिनींचा कुडाळमध्ये सन्मान

कातकरी भगिनींचा कुडाळमध्ये सन्मान

sakal_logo
By

79406
कुडाळ ः रथसप्तमी निमित्त जि.प. प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडाच्या शिक्षकवृंदांकडून कातकरी भगिनींचा सन्मान करण्यात आला

कातकरी भगिनींचा कुडाळमध्ये सन्मान
कुडाळ ः रथसप्तमी निमित्त कातकरी भगिनींचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडाच्या शिक्षकवृंदांकडून हळदीकुंकू, तिळगुळ व वाण देत सन्मान करण्यात आला.
शिक्षकवृंदांनी कातकरी वस्तीवर जाऊन तेथील महिला, मुले यांना एकत्र केले. उपस्थित सर्वांचे स्वागत उपशिक्षिका गौरी गोसावी यांनी केले. मुख्याध्यापिका श्रीमती स्वप्नाली सावंत यांनी मकरसंक्रांत सणाविषयी व या कालखंडातील आहार कसा असावा याविषयी माहिती दिली. उपशिक्षिका प्राची आंगणे यांनी स्वच्छता व आरोग्य विषयक माहिती दिली. त्यानंतर सर्व महिलांना हळदी कुंकू , फूल, तिळगूळ व वाण देण्यात आले. उपस्थित मुले व पुरुषांनाही तिळगुळ दिले. या कार्यक्रमामुळे सर्व मुले, माणसे खूश झाली. आभार मुख्याध्यापिका श्रीम. स्वप्नाली सावंत यांनी मानले. तिळगूळ वाटप कार्यक्रमाने कातकरी लोकांच्या जीवनात गोडवा व आनंद आणण्याचा छोटासा प्रयत्न कुंभारवाडा शाळेच्या शिक्षकवृंदांनी केला. याप्रसंगी कातकरी महिला , मुले उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक व शिक्षक पालक संघ यांकडून कौतुक करण्यात आले.