गवळदेव मंदिरात आजपासून सोहळा
79408
श्री गवळदेव
गवळदेव मंदिरात आजपासून सोहळा
ऋग्वेद स्वाहाकार याग ः भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
कुडाळ, ता. ३१ ः येथील श्री गवळदेव मंदिरात उद्यापासून (ता.१) ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळा सुरू होत आहे. १ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे सात दिवस विविध रुपात श्री गवळदेवाची मूर्ती असणार आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत श्री गवळदेव उत्सव समिती अध्यक्ष प्रशांत राणे व श्री गवळदेव मित्रमंडळ अध्यक्ष दादा पडते यांनी दिली.
येथील श्री गवळदेव मंदिर येथे मंदिराच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळा २०२३ आयोजित केला आहे. याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी नंदू गावडे, राजेश पडते, विनेस तिरोडकर, बबन कुंभार, विलास पावसकर आदी उपस्थित होते.
श्री. पडते व श्री राणे यांनी सांगितले की, यानिमित्त १ ला सकाळी ७ वाजता यजमान प्रायश्चित क्षौर देवतावंदन बहुमान, गार्हाणे, संकल्प, पुण्याहवाचन, आचार्यवरण, स्थलशुध्दी, मंडपप्रवेश, देवता स्थापना, अग्नीमंथन, अग्नीप्रतिष्ठा, ग्रहयज्ञ, देवतास्थापना, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार प्रारंभ, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती व तिर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ ते ११ वाजता श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, महेश सावंत प्रस्तुत १२५ पखवाज वादन, २ ला सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती व तिर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६ वाजता अष्टावधान सेवा, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ ते ११ वाजता सुश्राव्य किर्तन - हभप राजु मुंडले, ३ ला सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती व तिर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६ वाजता जागर - राजू मुंडले गुरूजी, सायं. ७ वाजता आरती, सायंकाळी ७.३० वाजता चक्रीभजनाचा महासंग्राम’, शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती व तिर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ७.३० ते ९ वाजता सातेरी ग्रुप भजन, रात्री ९ ते ११ वाजता वारकरी भजन श्री वालावलकर यांच्या सौजन्याने, ५ ला सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती व तिर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ ते १० वाजता वृंदावनी वेणु कार्यक्रम, ६ ला सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११.३० वाजता बलिदान, दुपारी १२ वाजता पुर्णाहूती अभिषेक सांगता, नैवेद्य, आरती, प्रार्थना, आशिर्वाद, समाराधना, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती व तिर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६ वाजता श्री गवळदेव कुपन लकी ड्रॉ, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ७.३० ते ९ वाजता नामस्मरण व महिला मंडळाचे भजन, रात्री ९ ते ११ वाजता श्री ब्राम्हण देव भजन मंडळाचे भजन होईल.
---
इतर कार्यक्रम असे
७ ला सकाळी ८ ते १२.३० वाजता श्री गवळदेव चरणी लघु रूद्र वैगेरे वार्षिक अनुष्ठान नैवेद्य आरती प्रसाद, दुपारी १ ते ४ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ- सद्गुरू वामनराव पै सत्यंग, सायंकाळी ७ वाजता आरती, सायंकाळी ७.३० ते ८.३० वाजता सिध्दिविनायक भजन मंडळ गांधी चौक कुडाळ यांचे भजन, सायंकाळी ९ ते १० वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री १०.३० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा दिप माझा वंशाचा’ नाट्यप्रयोग, ८ ला सायंकाळी ४ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रीकसीनयुक्त स्वामी अन्नपूर्णा’ हा नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गवळदेव उत्सव समिती व श्री गवळदेव मित्रमंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.