लोककलाकर रणशुर यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोककलाकर रणशुर यांचा सत्कार
लोककलाकर रणशुर यांचा सत्कार

लोककलाकर रणशुर यांचा सत्कार

sakal_logo
By

79403
मालवण : येथे नुकताच वराड येथील लोककलाकर उल्हास विष्णू रणशुर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


लोककलाकर रणशुर यांचा सत्कार
सिंधुदुर्गनगरी: मालवण येथे नुकत्याच झालेल्या कला व संस्कृती संचानालय गोवा सरकार आणि कला पर्यटन आणि संस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त कला नाट्योत्सवात वराड येथील गोंधळी लोककलाकर उल्हास विष्णू रणशुर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्री रणशुर हे हरहुन्नरी गोंधळी कलाकार असून त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षापासून आपल्या वडिलांसोबत ही कला सादर करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी सिंधुदुर्ग ,गोवा या भागात आपली पारंपारिक कला सादर करत सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या उल्हास यांनी अथक मेहनत करुन अनेक पारितोषिके, व मानपत्रे मिळविली. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नोकरीस असून नोकरी व कला या दोन्ही गोष्टी जोपासत आहेत.