गुळदुवेत पुस्तक प्रदर्शन निबंध लेखनाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळदुवेत पुस्तक प्रदर्शन
निबंध लेखनाला प्रतिसाद
गुळदुवेत पुस्तक प्रदर्शन निबंध लेखनाला प्रतिसाद

गुळदुवेत पुस्तक प्रदर्शन निबंध लेखनाला प्रतिसाद

sakal_logo
By

79412
गुळदुवे : येथे पुस्तक प्रदर्शनानिमित्त वाचकांना मार्गदर्शन करण्यात आले.

गुळदुवेत पुस्तक प्रदर्शन
निबंध लेखनाला प्रतिसाद
सावंतवाडी : ज्ञानदीप वाचनालय, गुळदुवे येथे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले व निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. पुस्तक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आली. निबंध लेखन स्पर्धेनंतर झालेल्या कार्यक्रमात मालवणी कविता, चारोळी, मालवणी हायकू इत्यादि काव्यप्रकारात लेखन करणारे विनय सौदागर म्हणाले, ‘‘आपण पुष्कळ वाचन केले.सात हजार पुस्तके वाचली आणि त्यातून वयाच्या बावन्नव्या वर्षी पहिली कविता लिहिली आणि त्यानंतर वाचकांनी, वृत्तपत्रांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कविता लिहित गेलो.त्यामुळे काही पुस्तके आपल्याकडून लिहिली गेली.सततच्या वाचनातूनच आपल्याला लिहिण्याची प्रेरणा मिळते आहे. त्यामुळे तुम्ही वाचत राहा. तुमच्यातील एखादा लेखक ,कवी जागा होईल.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कार्यवाह अरूण धर्णे यांनी केले.सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अशोक धर्णे होते.त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण केले.शेवटी सर्वांना तिळगूळ वाटून कार्यक्रमाचा समारोप झाला.''मराठी भाषा संवर्धन पंधरवडा'' निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना वाचनालयाचे अध्यक्ष फटू धर्णे, उपाध्यक्ष श्री मोहन कारेकर, खजिनदार श्रीमती ज्योती पेंडसे, सदस्य रुपेश धर्णे, संतोष सावंत,अमेय धर्णे, कर्मचारी नंदकिशोर धर्णे,अनिल जोशी आदी उपस्थित होते.