सावंतवाडीत पोलिस गस्त वाढवा

सावंतवाडीत पोलिस गस्त वाढवा

Published on

79435
सावंतवाडी : पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी चर्चा करताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर. शेजारी विलास जाधव, सुरेश भोगटे, अन्नपूर्णा कोरगावकर व अन्य. ( छायाचित्र : रुपेश हिराप)


सावंतवाडीत पोलिस गस्त वाढवा

बबन साळगावकर : चोरट्यांना भय उरले नाही, अनेकांना ऑनलाईन गंडवण्याचे प्रकार

सावंतवाडी ता. ३१: शहरात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या तसेच ऑनलाइन पद्धतीने अनेकांना गंडवण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबर गस्तीवर जास्त भर द्या, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याजवळ केली.
शहरात सोमवारी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली होती. शहरातील माठेवाडा भागात हा प्रकार घडला होता. एकूणच यानंतर श्री साळगावकर यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. विविध विषयांबाबत आपण पोलीस निरीक्षकांची भेट घेणार असल्याचेही सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आज साळगावकर यांनी पोलीस निरीक्षक मेंगडे यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संतोष तळवणेकर, उमेश खटावकर, तौकीर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील सुरक्षिततेबाबत पोलिसांचे लक्ष वेधतांना श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोऱ्या पाहता चोरांना पोलीस यंत्रणेचा भय राहिला नाही. अनेकांना मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने आर्थिक दृष्ट्या गंडविण्याचे प्रकारही सुरू आहेत; मात्र याबाबत पोलीस यंत्रणा अनभिज्ञ आहे. शहरातील बऱ्याच चोऱ्यांच्या अद्याप छडाही लागलेला नाही. सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली मंदिरातील चोरी प्रकरणी तपासात पोलिसांना अद्यापही अपयश आले आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे . शहरात गस्त वाढवण्याबरोबरच ऑनलाइन पद्धतीने होणारी फसवणूक थांबवण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घ्या.’’
यावेळी निरीक्षक श्री मेंगडे म्हणाले," काल झालेली चोरीची घटना खरी आहे. याबाबत शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत; मात्र संबंधित महिलेकडून पोलिसात अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही .तरीही पोलिसांकडून गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू आहे. शहरातील चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून रात्रीच्या वेळी तब्बल दोन वेळा सायरन वाजवून पेट्रोलिंग केले जाते. दिवसाही शहरात पेट्रोलिंग सुरूच असते. त्यामुळे बऱ्यापैकी अशा घटना रोखण्यास आम्हाला यश आले आहे तरीसुद्धा शहरातील सुरक्षितेचा भाग लक्षात घेता अजून पेट्रोलिंग वाढवण्याबरोबरच ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या फसवणूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती मोहीम हाती घेतली जाईल, पोलीस यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करणारच परंतु ऑनलाईन फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे एखादा मेसेज किंवा फोन समोरून आल्यावर त्याची खात्री करून संबंधित विभागाला त्याची कल्पना देणे गरजेचे आहे याबाबत प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे व विलास जाधव यांनी शहरातील गोडाऊनच्या परिसरात तसेच जिमखाना परिसरात व अन्य काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना केल्या. तसेच बंद असलेले सीसीटीव्ही दुरुस्त करण्याची विनंती केली.
------
चौकट
सोनुर्ली चोरीचा तपास सुरुच
सोनुर्ली श्रीदेवी माऊली मंदिरातील चोरी प्रकरणी तपास युद्धपातळीवर सुरू आहे. सद्यस्थितीत हा तपास एलसीबीकडे आहे; मात्र असे असले तरी सावंतवाडी पोलीस ठाण्याकडूनही आम्ही आमच्या पद्धतीने तपास सुरूच ठेवला आहे. लवकरच या चोरीतील आरोपी गजाआड करु, असे पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com