
टुडे साठी- संक्षिप्त पट्टा
rat३१२०.txt
(टुडे ५ साठी, संक्षीप्त)
फोटो
- rat३१p८.jpg -
७९४९७
दापोली : विजेता दापोली संघाला परितोषिक देताना मान्यवर.
लिग स्पर्धेत अखिल शिक्षक संघ विजयी
दाभोळ, ता. :३१ दापोलीच्या आझाद मैदानावर अखिल टिचर प्रिमियर लिग स्पर्धेत यजमान अखिल शिक्षक संघाने चषकावर नाव कोरत ११ हजार १११ रूपये आणि चषक पटकावला. या स्पर्धेत दोन दिवसात चार वेळा मॅन ऑफ द मॅच मिळवणारे अखिलचे दत्ता गिलबिले हे मॅन ऑफ सिरीजचे मानकरी ठरले. मंडणगडचा संघ उपविजेता ठरला त्याला ७ हजार ७७७ व चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी संजय पवार, महेश शिंदे, साईराज देसाई आणि अमित बिंद यांनी पंच म्हणून उत्कृष्ठ कामगीरी केली, तर दत्ता क्षिरसागर, अशोक कदम, दिपक बेणेरे आणि संदेश चव्हाण यांनी सामन्यांचे समालोचन केले. जिल्ह्यातील ज्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्या सर्व संघाचे तसेच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले. त्या सर्वांचे विजय फंड यांनी आभार मानले. मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
रेल्वे प्रवासी संघटनेची कार्यकारणी जाहीर
लांजा : तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन येथे झालेल्या बैठकीत रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल रेडीज तर उपाध्यक्षपदी रवींद्र खामकर यांची निवड झाली. याच सभेत विलवडे रेल्वे स्थानकाचे प्रा. मधु दंडवते विलवडे असा नाम विस्तार करण्यासाठी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेच्या नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी अमोल रेडीज तर उपाध्यक्षपदी रवींद्र खामकर, सचिव सुरेश शिगम, अमोल पळसुलेदेसाई, उपसचिव उदय पळसुले देसाई, उमेश पडीलकर, खजिनदार अनिस वाघू, तर कार्यकारणी सदस्य संतोष शिगम, शशिकांत खामकर , संजय आयरे, युवराज हांदे, पंढरी चव्हाण, संकेत माईल, जितेंद्र ब्रीद, अनिल सोलकर , रमेश राजापकर, अनवर रखांगी, शिवाजी साळुंखे, सूर्यकांत कानसे, रुपेश खामकर तर सल्लागारपदी भालचंद्र लाड, जगदीश राजापकर, दिलीप पळसुले देसाई आत्माराम चव्हाण, तुषार पालकर यांची निवड करण्यात आली. पुन्हा एकदा प्रवासी संघटनेचे काम नव्या जोमाने करण्याचे सभेत ठरवण्यात आले. त्याचबरोबर विलवडे रेल्वे स्थानकाचा प्राचार्य मधु दंडवते विलवडे स्थानक असा नाम विस्तार करण्यासाठीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्रवाशांच्या सोयीसाठी अपंग वयोवृद्ध प्रवाशांसाठी लिफ्टची व्यवस्था, सध्या असलेल्या प्लॅटफॉर्मवर चार पंख्यांची व्यवस्था, विलवडे स्थानकाला नवीन प्लॅटफॉर्म ची व्यवस्था, मांडवी व नेत्रावती एक्सप्रेसला थांबा, संपूर्ण प्लॅटफॉर्मला शेड, बांधणे तसेच पेवर ब्लॉक बसवणे, प्राधान्याने संगणकीय आरक्षण प्रणाली सुरू करणे, इत्यादी कामे कोकण रेल्वे कडून करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे ठरवण्यात आले. सभेला प्रवासी संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते त्याचबरोबर रिक्षा संघटना आणि वडाप संघटनेचे पदाधिकारी आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
-
आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
दाभोळ : दापोली संगीत विद्यालयाच्या द्विदशकपू्र्तीचे औचित्य साधून दापोली येथे ८ फेब्रुवारीला आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. दापोली शहरातील मारूती मंदिराजवळील वर्तक यांच्या वास्तुमध्ये संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. संगीत विद्यालयाच्या संचालिका वीणा महाजन यांनी कुडावळे गावी राहून संगीत साधना केली. त्यासाठी मुंबई येथे नियमित ये-जा करून त्यांनी पंडित यशवंतबुवा जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले आणि संगीत अलंकार पदवी प्राप्त केली. ते करत असतानाच शास्त्रीय संगीताचा अभ्यास ग्रामीण भागातील संगीत प्रेमींनाही करता यावा, यासाठी त्यांनी कुडावळे येथे १९९८ मध्ये गांधर्व संगीत महाविद्यालयाशी संलग्न अभ्यास केंद्र सुरु केले. दापोली परिसरातील अनेकांनी या केंद्रात प्रवेश घेतला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे २००० मध्ये कुडावळे येथे गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या उत्तर रत्नागिरीतील पहिल्या परीक्षा केंद्राला मंजुरी मिळाली. १ फेब्रुवारी २००३ रोजी वीणा महाजन यांनी दापोली संगीत विद्यालयाची मुहूर्तमेढ उभारली. दापोलीतील पापरीकर यांच्या वास्तूत या विद्यालयाचे वर्ग सुरू झाले. महाड, मंडणगडसह दापोली तालुक्यातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयातील विद्यार्थी या विद्यालयात संगीत साधना करण्यास येऊ लागले. यातील अनेक विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा पातळीवरील संगीत स्पर्धांमध्ये यश मिळविलेच, पण अनेकांनी शास्त्रीय संगीत साधनेचे हे बीज संगीत शिक्षक म्हणून आपापल्या परिसरातही रूजविले. वीणा महाजन यांनी दापोलीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन संगीताचेही वर्ग सुरू केले. विशेष म्हणजे अतिदुर्गम घराडी येथील अंध शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांनी शास्त्रीय संगीत साधनेचा वसा दिला. यातील दोन दिव्यांग विद्यार्थ्यांनी संगीत विशारद ही पदवीही प्राप्त केली आहे. हे सर्व आजी-माजी विद्यार्थी आपापली संगीतकला सादर करून दापोली संगीत विद्यालयाच्या या द्विशतक पूर्ती सोहळ्याचा आनंद साजरा करणार आहेत.
--
सायन्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
दाभोळ : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला. या कार्यक्रमाला दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदेश जगदाळे, उपाध्यक्ष अँड. प्रथमेश भोसले आणि सेक्रेटरी प्रा. अजिंक्य मुलुख उपस्थित होते. यावेळी सौरभ घांगुर्डे, नगरसेविका शिवानी खानविलकर, गौरी खटावकर, जयवंत काटकर या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वेळच्या महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांसाठी फनी गेमस्चे आयोजन केले होते. सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन महाविद्यालयातील विविध विभाग, प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना आदी पाहून आनंद व्यक्त केला. यावेळी माजी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी, त्याची पुढील प्रगती जाणून घेण्यासाठी उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र मोरे, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. दिगंबर कुळकर्णी, तसेच प्रा. शंतनु कदम, प्रा. विश्वेश जोशी यांसह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
-
महाविद्यालयात रस्ते सुरक्षेवर व्याख्यान
दाभोळ : दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आज महाविद्यालयात रस्ते सुरक्षा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आणि ज्योती चव्हाण यांनी रस्त्यावर वाहन चालवताना पाळायच्या विविध नियमांची माहिती देऊन नियम पाळण्याचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र मोरे आणि अजिंक्य मुलुख यांच्या बरोबरच प्रा. अनिरुद्ध सुतार, प्रा. तेजस मेहता यांनी केले
-
केवळ फोटो
ओळी
- rat३१p११.jpg -
७९५१३
साडवली : तायक्वांदो पटु साहिल घडशीचा सत्कार करताना माजी आमदार सुभाष बने.
-----