तत्कालीन लेखापालाला सशर्त जामिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तत्कालीन लेखापालाला सशर्त जामिन
तत्कालीन लेखापालाला सशर्त जामिन

तत्कालीन लेखापालाला सशर्त जामिन

sakal_logo
By

तत्कालीन लेखापालास सशर्त जामिन
दापोली नगरपंचायत ः आर्थिक अपहार केल्याचा ठपका
दाभोळ, ता. ३० : आर्थिक अपहार केल्याचा आरोप असलेले दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांना दापोली न्यायालयाने सशर्त जामिन मंजूर केला. त्यामुळे गेले काही महिने रत्नागिरी येथील जिल्हा कारागृहात असलेल्या सावंत यांची जामिनावर मुक्तता झाली आहे.
दिपक सावंत यांनी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २२ या कालावधीत लेखापाल होते. पदाचा गैरवापर करून दापोली नगरपंचायतीच्या विविध खात्यातून ५ कोटी ८१ लाख १० हजार ३०९ इतक्या रकमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवला होता. सावंत याने दापोली नगरपंचायतीच्या विविध बँक खात्यांची २ कँश बुके तयार केली व त्यामध्ये खोट्या नोंदी करून तसेच श्री इंटरप्रायझेस या नावाने खाते उघडून त्या खात्यात त्या खात्याचे नावाने चेक काढून त्या खात्यात भरून शासनाची फसवणूक केली. अपहार लपविण्यासाठी व कायदेशीर शिक्षेपासून वाचण्याच्या उद्देशाने पुरावे नष्ट करण्यासाठी नमुना नंबर ६३ व ६४ चे व्हाऊचर नष्ट केल्याची माहिती दोषारोपात ठेवण्यात आली होती.
तपास अधिकाऱ्यांनी १९ डिसेंबरला न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यात विविध स्वरूपाचे ९ मुद्दे तपास अधिकारी यांनी न्यायालयासमोर मांडले आहेत. युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दीपक सावंत यांनी सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. त्यात या प्रकरणाचा तपास अद्याप प्रलंबित असल्याने सावंत यांनी तपास अधिकारी जेव्हा चौकशीला बोलवतील तेव्हा हजर राहावे, दापोली नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात प्रवेश करू नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये तसेच पुराव्यात ढवळाढवळ करून नये, खटला प्रलंबित असेपर्यंत भारत देश सोडून जावू नये अशा अटी घातल्या आहेत.