हातखंबा तिठ्याजवळील अनधिकृत टपऱ्यांची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातखंबा तिठ्याजवळील अनधिकृत टपऱ्यांची पाहणी
हातखंबा तिठ्याजवळील अनधिकृत टपऱ्यांची पाहणी

हातखंबा तिठ्याजवळील अनधिकृत टपऱ्यांची पाहणी

sakal_logo
By

rat३१३१.txt

(पान ३ साठी, मेन)

फोटो
- rat३१p२०.jpg-
७९५५६
रत्नागिरी- हातखंबा तिठा येथील शासनाने संपादित केलेल्या जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांची गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
--

हातखंबा तिठ्याजवळील अनधिकृत टपऱ्यांची पाहणी

बीडिओंची स्थानिकांशी चर्चा ः प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ३१ : मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी शासनाने संपादित केलेल्या जागेत हातखंबा तिठ्याजवळ अनेकांनी अनधिकृत टपऱ्या उभारल्या आहेत. याला मुळ मालकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी आज घटनास्थळी भेट देऊन अनधिकृत टपऱ्यांची पाहणी केली.

शासनने अधिग्रहण केलेल्या जमीन मालकांच्या घरासमोरील जागेत अनधिकृत टपऱ्यां उभारण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडे वादग्रस्त अनधिकृत टपऱ्यांसंदर्भात मुळ मालक लेखी तक्रारी करून वारंवार पाठपुरावा करीत आहेत. मात्र आठ महिने उलटून देखील प्रशासन कोणताही ठोस निर्णय अनधिकृत टपऱ्यांसंदर्भात घेत नसल्याचे चित्र आहे. आज गटविकास अधिकारी (बीडीओ) जयेंद्र जाधव यांनी वादग्रस्त टपऱ्यांची घटनास्थळावर येऊन पाहणी केली. जाधव यांनी दीड तास टपरी चालक आणि मूळ जमिन मालक यांच्याशी थेट चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे ही प्रयत्न निष्फळ ठरले. अनधिकृत टपऱ्यांसंदर्भात ग्रामस्तरावर ठोस पावले उचलून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तशा पद्धतींच्या कोणत्याही हालचाली नसल्याने दिसुन आले. दीड तास झालेल्या चर्चेत मुळ जमीन मालकानी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, अनधिकृत टपरी धारकांनी स्वतःच्या जमिनीत काहीही उभारावे, आमची कोणतीही हरकत नाही व पुढे ही नसेल. मात्र दुसऱ्याच्या जमिनी हडप करून विनाकारण वाद निर्माण करून त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. दरम्यान या वादग्रस्त अनधिकृत टपऱ्यांची गटविकास अधिकारी जाधव यांनी पाहणी केली आहे. त्यामुळे आता या टपऱ्यांवर गटविकास अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.