
नारिंग्रेचा शुटींग हॉलीबॉल संघ विजेता नारिंग्रेचा शुटींग हॉलीबॉल संघ विजेता
79606
देवगड ः येथे हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या शूटिंग हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला गौरवण्यात आले.
नारिंग्रेचा शुटींग हॉलीबॉल संघ विजेता
देवगडमधील स्पर्धा; जलद सायकल स्पर्धाही उत्साहात
देवगड, ता. ३१ ः येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या शूटिंग हॉलिबॉल स्पर्धेत तालुक्यातील नारिंग्रे येथील गांगेश्वर हॉलिबॉल संघ विजेता ठरला. महोत्सवाचे यंदाचे ४३ वे वर्ष होते. शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेसह अन्य स्पर्धांचे बक्षिस वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शालेय व खुला गट जलद सायकल स्पर्धा अनुक्रमे खाकशी व दाभोळे तिठा ते देवगड हायस्कूल नाका, अशी घेण्यात आली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांचे हस्ते झाले होते. त्यावेळी मंडळाचे जेष्ठ सदस्य हनिफ मेमन व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे वैयक्तिक स्पर्धाचे उदघाटन शेठ म. ग. हायस्कुलच्या मैदानावर मंडळाचे अध्यक्ष विलास रुमडे यांचे हस्ते करण्यात आले. हॉलीबॉल सामन्याचे उदघाट्न देवगड एज्युकेशन बोर्डाचे जनरल सेक्रेटरी शंकर धुरी यांचे हस्ते झाले. स्पर्धांच्या बक्षीस वितरणावेळी मिलिंद माने, दिग्विजय कोळंबकर, वाडा हायस्कुलचे मुख्याध्यापक नारायण माने, मंडळाचे अध्यक्ष विलास रुमडे, देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, माजी अध्यक्ष विजय जगताप, द. ना. चव्हाण, सदानंद सावंत, श्रीकृष्ण मेस्त्री, सचिव शरद लाड, राजू जगताप, सुरेंद्र लांबोरे, श्रीकांत बिडये, अरुण चव्हाण, शिवप्रसाद पेडणेकर, संतोष गुडेकर, विठोबा तारी, राजेंद्र राणे, संतोष ढोके तसेच मंडळाचे हितचिंतक उपस्थित होते. स्पर्धांची सर्व बक्षिसे ओमटेक असोसिएट, नगरसेविका प्रणाली माने, हनिफ मेमन, बाळा कोळंबकर, पारकर फिशरीज, देवगड तालुका हॉलीबाल असोसिएशनचे अध्यक्ष संजय कदम, राजीवकुमार भावे, डॉ. सुनील आठवले यांनी पुरस्कृत केली होती. तसेच मंडळाच्या अनेक हितचिंतकानी आर्थिक सहाय्य केले. पंच म्हणून संजय कदम, राजीवकुमार भावे व इसाक रखागीं यांनी काम पाहिले. प्रास्ताविक करून आभार विलास रुमडे यांनी मानले. सुत्रसंचालन शरद लाड यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा, हॉलीबॉल स्पर्धा -गांगेश्वर हॉलिबॉल संघ, नारिंग्रे (५००० रूपये व चषक), दिर्बा रामेश्वर व्हॉलीबॉल संघ जामसंडे (३००० रूपये व चषक), उत्तेजनार्थ -फेंड सर्कल व्हॉलीबॉल संघ, पडेल (२००० रूपये रोख), मोरेश्वर व्हॉलीबॉल संघ मोर्वे (२००० रूपये रोख), जलद सायकल स्पर्धा -शालेय गट -साहील इम्रान शेख, खुशाल प्रवीण कदम, उत्तेजनार्थ -उमंग उमाकांत कुबल, आर्यन विजय कदम, खुला गट -श्रीपाद अरुण चव्हाण, संदेश प्रकाश भुजबळ, उत्तेजनार्थ -सिध्दराम उमाजी हिप्परकर, अथर्व जितेंद्र गोळवणकर, २०० मीटर धारणे -महिला गट -सानिया संजय तांबे, सानिका पुंडलिक पावशे, रेणुका विलास राणे, पुरुष गट -धनराज मंगेश घाडी, राज दत्तगुरू कणेरकर, रोशन रवींद्र खरात, २०० मीटर धावणे महिला गट -सानिया संजय तांबे, सानिका पुंडलिक पावसे, रेणुका विलास राणे, ४०० मीटर धावणे -महिला गट -सानिया संजय तांबे, सानिका पुंडलिक पावसे, रेणुका विलास राणे, पुरुष गट -राज दत्तगुरु कणेरकर, रोशन रविंद्र खरात, दर्शन मंगेश चौकेकर, सिद्धेश सचिन मासये, रोशन रवींद्र खरात, सुजित आनंद धुवाळी, लांबउडी -महिला गट -सानिया संजय तांबे, रेणुका विकास राणे, अक्षता जिवबा दळवी, पुरूष गट -राज दत्तगुरू कणेरकर, धनराज मंगेश घाटी, विघ्नेश दशरथ कुलकर्णी, गोळाफेक -महिला गट -रेणुका विलास राणे, श्रुत्ती भालचंद्र सकपाळ, सानिया संजय तांबे, पुरूष गट -दीपराज दामोदर मेस्त्री, रोशन रवींद्र खारात, सचिन श्रीकृष्ण घाडी, उंचउडी -पुरुष गट -सिद्धेश सचिन मासये, दीपराज दामोदर मेस्त्री, धनराज मंगेश घाडी व सुजित आनंद धुवाळी.