जिल्हा सब जुनिअर अॅथलेटीक्स निवड
rat३१३४.TXT
जुनिअर अॅथलेटीक्स निवड ८ फेब्रुवारीला
रत्नागिरी, ता. ३१ ः कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब जुनिअर अॅथलेटीक्स स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनतर्फे ८ फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्हा सब जुनिअर अॅथलेटीक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा ८ वर्षे, १० वर्षे आणि १२ वर्षांखालील मुले व मुली अशा तीन गटात होणार आहेत. स्पर्धकांनी चिपळूण येथील डेरवण क्रीडा संकुलात सकाळी ८ वाजता उपस्थित राहायचे आहे.
प्रत्येक क्रीडा प्रकारातील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंची कोल्हापूर येथे ४ ते ५ मार्च दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. वयोमर्यादा ८ वर्षे गट १२ फेब्रुवारी २०१५ ते ११ फेब्रुवारी २०१७ दरम्यान जन्मलेला. १० वर्षे गट १२ फेब्रुवारी २०१३ ते ११ फेब्रुवारी २०१५ दरम्यान जन्मलेला, १२ वर्षे गट १२ फेब्रुवारी २०११ ते ११ फेब्रुवारी २०१३ दरम्यान जन्मलेला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ८ वर्षे गटात ५० मीटर, ८० मी., लांबउडी. १० वर्षे गटात ५० मीटर, १०० मी., लांबउडी, गोळाफेक तर १२ वर्षे गटात ६० मीटर, २०० मी., लांबउडी, उंचउडी, गोळाफेक या खेळांचा समावेश राहील. खेळाडू जास्तीत जास्त दोन क्रीडा प्रकारात सहभागी होऊ शकतो. अधिक माहितीसाठी अॅथलेटीक्स प्रशिक्षक अविनाश पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव संदीप तावडे यांनी केले आहे. स्पर्धकांनी https://forms.gle/s८W६८uAL८jjydx७A७ या लिंकवर ७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.