आयटीचे छापे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीचे छापे
आयटीचे छापे

आयटीचे छापे

sakal_logo
By

बंगळूरमधील दागिन्यांच्या
दुकानांवर आयटीचे छापे
बंगळूर, ता. ३१ : करचुकवेगिरीच्या पार्श्वभूमीवर प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २५ हून अधिक प्रमुख दागिन्यांच्या दुकानांवर आणि मालकांच्या निवासस्थानांवर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी चिक्कपेठ, जयनगर, यशवंतपूर, बसवनगुडी यासह २५ हून अधिक ठिकाणी छापे टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत.
बनशंकरी येथील पार्श्‍व फार्मास्युटिकल्सचे मालक राजेशकुमार जैन यांच्या दुकानावर आणि जयनगर येथील घरावर १५ हून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. छाप्यात कागदपत्रे सापडली असून ती अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती आहेत. तसेच शंकरपुरम येथील उत्तम जैन यांच्या प्लॉटवर छापा टाकला. १५ हून अधिक अधिकारी सकाळी सात वाजता आले आणि त्यांनी कागदपत्रे तपासली. उत्तम जैन यांच्या अरिहंत कोस्टल अपार्टमेंट या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकला. ३०० हून अधिक अधिकाऱ्यांनी जयनगर, यशवंतपूर, बसवनगुडी, चिक्कापेठसह शहरातील २५ भागांत झडती घेतली. छाप्यादरम्यान सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांच्या पथकाने कर्मचारी तैनात केले होते.