भाविकांसाठी मोफत अल्पोपहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांसाठी मोफत अल्पोपहार
भाविकांसाठी मोफत अल्पोपहार

भाविकांसाठी मोफत अल्पोपहार

sakal_logo
By

यात्रेकरूंसाठी मोफत अल्पोपहार
मालवण ः दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवी यात्रेला येणार्‍या भाविकांसाठी सद्गुरू भक्त सेवा न्यास संलग्न स्वामी समर्थ मठ, मसदे वडाचापाट तर्फे स्वामी समर्थ मठामध्ये विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे. ४ व ५ फेब्रुवारीला सकाळी सात ते अकरा पर्यंत चहा, नाश्ता, दुपारी साडेबारा ते तीनपर्यंत भोजन, सायंकाळी चहा, अल्पोपहार देण्यात येणार आहे. स्नान व बाथरुमची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस, ट्रॅफिक पोलिस, एसटी वाहक, चालक व इतर कर्मचाऱ्‍यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
---
जय गणेश स्कूलचा १०० टक्के निकाल
मालवण ः इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलने यश संपादन केले. प्रशालेतर्फे एकूण १४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला होता. त्यात आठ विद्यार्थी अ श्रेणी व सहा विद्यार्थी ब श्रेणी संपादित करीत उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कलाशिक्षिका आदिती ठाकूर, स्मिता वायंगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी केले.
---
कणकवलीत रविवारी चित्रकला स्पर्धा
कणकवली ः मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट (मुंबई) व सिंधुदुर्ग कला महाविद्यालयाच्यावतीने ५ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता सिंधदुर्ग कला महाविद्यालय, कणकवली येथे प्रत्यक्ष शालेय चित्रकला स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विभाग अ पहिली ते चौथी, विभाग ब-पाचवी ते सातवी व विभाग क-आठवी ते दहावी अशा तीन विभागांत होणार आहेत. विजेत्यांना अनुक्रमे २५१ रुपये, १५१ रुपये, १०१ रुपये व उत्तेजनार्थ दोन पारितोषिके ५१ रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी दुपारी १ वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य, सिंधुदुर्ग कला महाविद्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
साक्षी रामदूरकरचे कॅरम स्पर्धेत यश
सावंतवाडी ः चिपळूण-डेरवण येथील शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत येथील मुक्ताई अ‍ॅकॅडमीची साक्षी रामदूरकर हिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. अकरा वर्षीय साक्षीने लातूर, नागपूर, मुंबईतील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकावला. तिला मुक्ताई अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. साक्षीला ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक रवी घोसाळकर यांच्या हस्ते आणि क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर, कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद सप्ते यांच्या हस्ते गौरविण्यात आले.