हर्णै-बेलोसे महाविद्यालयाच्या मैदान होणार सुरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै-बेलोसे महाविद्यालयाच्या मैदान होणार सुरक्षित
हर्णै-बेलोसे महाविद्यालयाच्या मैदान होणार सुरक्षित

हर्णै-बेलोसे महाविद्यालयाच्या मैदान होणार सुरक्षित

sakal_logo
By

rat०३४१.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat३p४.jpg ः
८०१३७
हर्णै ः मैदानाच्या बांधकामाचे उद्घाटन करताना संस्थेच्या सभापती जानकी बेलोसे. शेजारी संचालक अनंत सणस, प्राचार्य भारत कऱ्हाड.
---------------

बेलोसे महाविद्यालयाचे मैदान होणार सुरक्षित

संरक्षक भिंत बांधणार ; विविध खेळाची होणार मैदाने

हर्णै, ता. ४ः दापोली तालुक्यातील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या मैदान संरक्षण भिंत बांधकामाचे उद्घाटन नुकतेच झाले. वराडकर-बेलोसे महाविद्यालयात जुने मैदान पूर्णपणे खडकाळ व ओबडधोबड जमिनीवर बांधलेले असल्याने विद्यार्थ्यांना खेळताना खूप त्रास व्हायचा. हा त्रास टाळणे व विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदान सुसज्ज उपलब्ध करण्याचा संकल्प करून मैदान शेकडो ट्रक माती टाकून भरून घेतले आहे. त्याबरोबरच मैदानाच्या दोन्ही बाजू पूर्णपणे उताराच्या असल्याने मैदान वाहून जाऊ नये, हे लक्षात घेऊन मैदानाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
या मैदानाची पूर्व-पश्चिम लांबी ११० मीटर, दक्षिण-उत्तर लांबी अंदाजे १०० मीटर असून आवश्यकतेनुसार एक फूट रुंदी आणि पाच ते पंधरा फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू झाले आहे. मैदानातील पावसाचे पाणी आणि शेजारील वस्त्यांमधून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल आदी खेळाचे मैदान तयार करण्यात येत आहे. संस्थेच्या सभापती जानकी बेलोसे व संचालक अनंत सणस यांच्या हस्ते या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विश्वस्त धनंजय यादव, शिवाजी शिगवण, जैन, बापू मोरे, भाऊ पुळेकर, हर्डीकर, डॉ. भारत कऱ्हाड, डी. आर. कोळी, प्रा. राजेंद्र देवकाते, नंदकुमार जोशी व सहकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---