
करंजे येथे ऊसतोड मजूराचा मृत्यू
करंजे येथे ऊसतोड मजूराचा मृत्यू
कणकवली ः करंजे येथे ऊस तोडणीसाठी गेलेल्या कामगाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सत्यनारायण मागिलाल काजले (वय ३४, रा. लालाचापक, ता. सिराली), असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता.३) सकाळी दहाच्या सुमारास घडली. सत्यनारायण काजले हे त्यांची पत्नी व सोबतच्या कामगारासह करंजे येथे निलंबर निंबाळकर यांच्या शेतात ऊस तोडत होते. त्यादरम्यान त्यांच्या दोन्ही हात व छातीत अचानक दुखु लागले. त्यांना तातडीने कनेडीतील प्रथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
--
नांदगावातील एकाचा आकस्मिक मृत्यू
कणकवली ः नांदगाव तिठा येथील तय्यब याकुब नावळेकर (वय ५०) यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याप्रकरणी येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तय्यब नावळेकर हे झोपलेले असताना त्यांना अचानक उलटी होवून छातीत दुखु लागल्याने त्यांना उपचारासाठी नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितले.