तळेरेतील कबड्डी स्पर्धेत वालावलचा संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरेतील कबड्डी स्पर्धेत 
वालावलचा संघ विजेता
तळेरेतील कबड्डी स्पर्धेत वालावलचा संघ विजेता

तळेरेतील कबड्डी स्पर्धेत वालावलचा संघ विजेता

sakal_logo
By

80342
तळेरे ः जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या लक्ष्मीनारायण वालावल संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (छायाचित्र : एन. पावसकर)

तळेरेतील कबड्डी स्पर्धेत
वालावलचा संघ विजयी
तळेरे, ता. ३ : तळेरे-वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी क्रीडा मंडळातर्फे आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावल संघाने विजेतेपद पटकाविले. तर गुढीपूर पिंगुळी संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यात जिल्ह्यातील मातब्बर संघ सहभागी झाले. विजेत्या लक्ष्मीनारायण वालावल संघाला रोख रुपये ११,१११ रुपये, तर उपविजेत्या गुढीपूर पिंगुळी संघाला रोख ७,,७७७ रुपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले. तर तृतीय व चतुर्थ विजेत्या शिवभवानी सावंतवाडी व सिंधुपुत्र कोळोशी संघांना प्रत्येकी २,५५५ रुपये व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट चढाई-सुमित गावडे, उत्कृष्ट पकड-राजू बंगे, अष्टपैलू खेळाडू-योगेश घाडी यांचाही रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मान करण्यात आला.