परवेज सेवानिवत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परवेज सेवानिवत्त
परवेज सेवानिवत्त

परवेज सेवानिवत्त

sakal_logo
By

rat०४७.txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

फुरुसचे परवेज परकार सेवानिवृत्त

खेड ः फुरुस येथील एस. आय. सेकंडरी स्कूल अँड ज्यु. कॉलेजचे प्रयोगशाळा सहाय्यक परवेज परकार सेवानिवृत्त झाले. फुरुस शिक्षणसंस्था, फुरुस व प्रशालेच्यावतीने त्यांचा निरोप देण्यात आला. या प्रसंगी सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक तसेच एफ. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूलचे कर्मचारी, कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.
--

सुकीवली शाळेत आज शालेय साहित्य वाटप

खेड ः तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहर या संघटनेच्यावतीने खेड तालुक्यातील सुकीवली व साखर या गावातील शाळांमध्ये ५ फेब्रुवारीला सकाळी सुकीवली शाळा व दुपारी साखर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी गडसंवर्धनासाठी ६ फेब्रुवारीला सकाळी ७ वा. खेड तालुक्यातील किल्ले महिपतगडवर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
---

आयसीएस महाविद्यालयात शेअर मार्केटवर शिबिर

खेड ः सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, वाणिज्य शाखा आणि टी. डब्लू. जे. प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शेअर मार्केटसंदर्भात ''ट्रेडिंग आणि त्यामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी'' यावर मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख डॉ. सी. आर. साळुंखे यांनी केले. शेअर मार्केट म्हटलं की, धोका पत्करणे, पैसे गमावणे असे समज-गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याबद्दल टी. डब्लू. जे.प्रायव्हेट लिमिटेडचे ट्रेडिंग मॅनेजर, पंकज शिर्के तसेच असिस्टंट मॅनेजर चिन्मय पालकर, सायली रेडीज, सृष्टी रेडीज, वेदांत उंदुरे, ऋषिकेश खाडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अकाउंटन्सी शाखा विभागप्रमुख प्रा. एम. के. केळकर, वाणिज्य विभागातील प्रा. लीना चिखले, प्रा. सबीहा मोमेरे, प्रा. धनश्री दरेकर उपस्थित होत्या.
--

रंगभरण-चित्रकला स्पर्धेत नायर प्रथम

खेड ः कोकणी मुस्लिम संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धेत एल. टी. टी. इंग्लिश मीडियम स्कूलमधील हश्मिता नायर हिने प्रथम क्रमांक पटकावला. संस्थाध्यक्ष अहमद मुकादम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संचालक वाहिद मुकादम, जयेश गुहागरकर, माजीद खतीब, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, डॉ. पुष्कर नेने, मिलिंद पाटणे, समन्वयक जॉय, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, मुख्याध्यापिका पंकजा कुडाळकर आदी उपस्थित होते.
---

मैत्री फाउंडेशनतर्फे विद्यार्थिनींना सायकल वाटप

खेड ः मैत्री फाउंडेशनतर्फे तालुक्यातील ८ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. या प्रसंगी अॅड. बुटाला, लायन्स क्लबचे अध्यक्ष विक्रांत पाटील, शैलेश मेहता, रोटरी क्लबचे अध्यक्ष संकेत बुटाला, उद्योजक मिलिंद इवलेकर, अमोल जाधव, जेसीजचे अध्यक्ष प्रथमेश खामकर, फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर, सरचिटणीस साळुंखे, खजिनदार अमर चव्हाण, अनिल साळुंखे, प्रशांत दळवी, संतोष चव्हाण, तुकाराम काताळे, राजेंद्र बेलोसे, किशोर देसाई, लक्ष्मण चोरगे, परेश खोपडे, महेश मर्चंडे, किरण वाघमळे आदी उपस्थित होते.
---