बॅंकिंग नियमन, आरबीआय कायद्यातील सुधारणा उचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅंकिंग नियमन, आरबीआय कायद्यातील सुधारणा उचित
बॅंकिंग नियमन, आरबीआय कायद्यातील सुधारणा उचित

बॅंकिंग नियमन, आरबीआय कायद्यातील सुधारणा उचित

sakal_logo
By

rat०४१९.txt

बातमी क्र..१९ (पान ६ साठी)

फोटो ओळी
-rat४p१९.jpg ः
८०३७०
शेखरकुमार अहिरे
---

बॅंकिंग नियमन,आरबीआय कायद्यातील सुधारणा उचित

शेखरकुमार अहिरे ; पर्यटन, तंत्रज्ञानावर विशेष भर

राजापूर, ता. ४ ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये ‘सहकारातून समृद्धी’ या सरकारच्या ब्रीदवाक्याप्रमाणे सहकार क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे सहकार चळवळ जोमाने कार्यरत राहण्यास मदत होणार आहे. ही बाब आम्हा सहकारात काम करणाऱ्‍या कार्यकर्त्यांना आनंददायक व उत्साहवर्धक आहे, अशी प्रतिक्रिया राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार उत्तम अहिरे यांनी व्यक्त केली आहे. बँकिंग कामकाजात सुधारणा करण्यासाठी बँकिंग नियमन कायदा, आरबीआय कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव उचित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थसंकल्पावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यामध्ये राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अहिरे यांनीही आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. अर्थकल्पामध्ये आर्थिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाकांक्षी असे निर्णय जाहीर केले आहेत. त्यामुळे जगातील देशांमध्ये भारताचा मान अनेक मोठ्या निर्णयांमुळे वाढला आहे. जगामध्ये मंदी असूनही विकासाचा अंदाज ६० टक्के इतका राहिला आहे. आव्हानात्मक परिस्थितीतदेखील भारत मोठ्या प्रमाणावर विकासाने वाटचाल करत आहे. यामध्ये विशेषतः पर्यटनावर आणि तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेवर विशेष भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे. मोफत अन्नधान्य पुरवठा योजनांमुळे कुणीही उपाशी राहू नये याकरिता विशेष योजना केलेली दिसून येते. महिला सबलीकरणावर भर देण्यात आलेला असून रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न नक्कीच स्वागतार्ह असल्याचे मत अहिरे यांनी मांडले आहे.