दिव्यांगांसाठी १२ रोजी मोफत शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांसाठी १२ रोजी मोफत शिबिर
दिव्यांगांसाठी १२ रोजी मोफत शिबिर

दिव्यांगांसाठी १२ रोजी मोफत शिबिर

sakal_logo
By

दिव्यांगांसाठी १२ रोजी मोफत शिबिर
चिपळूण ः रोटरी क्लबतर्फे दिव्यांग व्यक्तींकरिता मोफत कृत्रिम हात व पाय देण्याचे शिबिर चिपळूण येथे १२ फेब्रुवारीला आयोजित केले आहे. स्काँन प्रो. फाउंडेशन पुणे, रोटरी क्लब ऑफ स्काँन प्रो. पुणे, रोटरी क्लब ऑफ चिंचवड पुणे व भारत विकास परिषद विकलांग केंद्र-पुणे यांच्यावतीने हे शिबिर घेण्यात येत आहे. शिबिरास स्थानिक पातळीवर रोटरी क्लब ऑफ चिपळूण व रोटरी क्लब ऑफ लोटे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. शिबिराच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीचा कृत्रिम पाय (मॉड्युलर लेग) व कृत्रिम हात आणि कॅलिपर मोफत दिले जाणार आहेत. मोजमाप शिबिराची वेळ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत असेल. हे शिबिर श्री पद्मावती संकूल, पाली रोड, पवन तलावाजवळ, मार्कंडी, श्री स्वामी समर्थ मंदिरामागे होणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी जेस्ते, पाटणकर यांच्याशी संपर्क साधावा. शिबिर ठिकाणी दिव्यांग व्यक्ती व सोबतच्या एका सहकाऱ्यास मोफत भोजनाची व्यवस्था रोटरी क्लबतर्फे केली आहे.