
गुलाबी थंडी... सुरांची मैफल... अन् शेंगांचा घमघमाट
rat०४६.txt
(पान २ साठी, अॅंकर)
फोटो ओळी
-rat४p२९.jpg-
८०४३१
खेड ः शहरानजीकच्या शेतात मोंग्याची तयारी करताना मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी.
---
गुलाबी थंडी... सुरांची मैफल... अन् शेंगांचा घमघमाट
खवय्यांना मोंगा महोत्सवाची पर्वणी ; मनसेचे आयोजन
खेड, ता. ४ ः सायंकाळची वेळ, हवेत पसरलेला गारवा सोबतीला मधूर सुरांची मैफल आणि हातात गरमागरम शेतातच शिजवलेल्या पावट्याच्या शेंगा अशा धुंद करणाऱ्या वातावरणात खेडवासीयांची संध्याकाळ रम्य झाली. निमित्त होतं मनसेने आयोजित केलेल्या ''मोंगा महोत्सवाचे''. या महोत्सवामुळे खवय्यांना जणू पर्वणीच लाभली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकणचे नेते वैभव खेडेकर यांच्या कल्पकतेतून अनोख्या अशा या मोंगा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्याला त्याच्या पिकाला योग्य भाव मिळावा, त्याच्या हाती चार पैसे राहावेत हा या महोत्सवामागील उद्देश होता. त्याचबरोबर शहरातील लोकांनाही शेतातील पदार्थांचा आस्वाद शेतातच घेता यावा ही कल्पनाही होती. मनसेने आयोजित केलेल्या हा मोंगा महोत्सव पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी खेड शहरवासीयांची पावले गुरुवारी सायंकाळी शहराजवळील शेताकडे वळू लागली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मोंगा बनवण्याची जबाबदारी स्वीकारली तर कार्यकर्त्यांनी शेतातच गोल रिंगण करून बैठक व्यवस्था तयार केली. मनसेच्या या अनोख्या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून दाद दिली.
--
लोकल टु ग्लोबल
फेब्रुवारी ते मार्च महिन्यात उत्तर रत्नागिरी जिल्हा तसेच रायगड जिल्ह्यात असा मोंगा प्रामुख्याने लावला जातो. रायगड जिल्ह्यात याला पोपटी असेही म्हणतात. मोंग्याची ही खासियत सर्वांना कळावी, हा शेतातील हा मोंगा जागतिक पातळीवर पोहोचावा असा हेतू या मोंगा महोत्सव आयोजनामागे आहे. लोकल टु ग्लोबल ही आमची संकल्पना शेतकऱ्यांचा फायदा करून देईल,असे मनसे नेते वैभव खेडेकर यांनी सांगितले.
---
सुरांची मैफल
या महोत्सवात उपस्थित लोकांची करमणूकही व्हावी या उद्देशाने पंचम मधूर ऑर्केस्ट्रा यांचा गायनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोरया मोरया, शारद सुंदर चंदेरी राती, गुलाबी आँखे, सांसो की जरूरत है जैसे, सखे ग साजणी ये ना, निशाणा तुला दिसला ना अशा अनेक गाण्यांनी मैफल रंगली. या वेळी गायक विनय माळी, नमिता माळी, पंकज जाधव, पवन सौंदरे, संजय कांबळे यांनी गीते सादर केली तर सूत्रसंचालन अंजली गिल्डा यांनी केले.