Wed, March 22, 2023

कणकवलीतून युवती बेपत्ता
कणकवलीतून युवती बेपत्ता
Published on : 4 February 2023, 2:52 am
80468
रवीना तळेकर
कणकवलीतून युवती बेपत्ता
कणकवली : तळेरे- औदुंबरवाडी येथील युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. रवीना दीपक तळेकर (वय २३), असे तिचे नाव आहे. तिच्या वडीलांनी दिलेल्या फियादीनुसार, रवीना शनिवारी (ता.४) सकाळी अकराला ‘‘बाजारपेठेत जाते’’, असे सांगून घराबाहेर पडली ती परत आली नाही. तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने ती बेपत्ता झाल्याची खबर तीचे वडील दीपक नारायण तळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिली. अंगावर फिकट गुलाबी रंगाचा फुल हाताचा टी-शर्ट, राखाडी जीन्स, उंची १६० सेंटीमीटर, असे तिचे वर्णन आहे. काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.