जनतेच्या सुखासाठी आई भराडीला साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनतेच्या सुखासाठी
आई भराडीला साकडे
जनतेच्या सुखासाठी आई भराडीला साकडे

जनतेच्या सुखासाठी आई भराडीला साकडे

sakal_logo
By

आंगणेवाडी ः येथे दर्शनासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.

जनतेच्या सुखासाठी
आई भराडीला साकडे

आंगणेवाडी जत्रोत्सवात नेते दर्शनाला

मालवण, ता. ४ ः सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आज आंगणेवाडी यात्रेनिमित्त श्रीदेवी भराडीचे दर्शन घेतले. यावेळी बहुसंख्य नेत्यांनी राज्यातील जनतेच्या सुखासाठी आई भराडीला साकडे घातले. या यात्रोत्सवाला दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकांनी दर्शन घेतले. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश होता. राज्यातील शेतकरी व मध्यमवर्गीय असा कोणताही वर्ग सुखी नाही. सर्व व्यवस्था डळमळीत झाली आहे. राज्यात असुरक्षितता वाढली असून सुरक्षितता निर्माण व्हावी, असे साकडे यावेळी पटोले यांनी भराडी मातेस घातले. यावेळी त्यांच्यासोबत महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, मेघनाद धुरी, बाळू अंधारी, पल्लवी तारी, ममता तळगावकर, संदेश कोयंडे यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.