
करसल्लागार, सीए ब्रॅंचच्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण
rat०६१२.txt
(टुडे पान ३ साठी)
फोटो ओळी
-rat६p३.jpg-
८०७४६
रत्नागिरी : करसल्लागार असोसिएशन आणि सीए ब्रॅंचच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांसह मान्यवर पदाधिकारी.
---
करसल्लागार, सीए ब्रॅंचच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धांचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खो- खो पटू अपेक्षा सुतार हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले होते. तीन दिवस स्पर्धा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर सुरू होत्या. ज्येष्ठ सीए श्रीकांत भाऊ वैद्य, करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरद पंडित, सीए ब्रॅंचचे अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, एंजल ब्रोकिंगचे राजेश सोहोनी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा (विजेता, उपविजेता या क्रमाने)- बुद्धिबळ वरद पेठे, वल्लभ महाबळ, कॅरम एकेरी- संदीप चव्हाण, सीए आयेशा अघाडी, कॅरम दुहेरी- केतन रहाटे व वरद पटवर्धन, योगेश भावे व जहूर हकीम. बॅडमिंटन पुरुष दुहेरी- केतन रहाटे व वरद पटवर्धन, राजेश सोहोनी व अथर्व करंदीकर. बॅडमिंटन पुरुष विद्यार्थी- अपूर्व मुळ्ये, अथर्व करंदीकर. बॅडमिंटन पुरुष एकेरी- वरद पटवर्धन, राजेश सोहोनी, बॅडमिंटन महिला एकेरी- सांची डांगे, तन्वी कामत. क्रिकेट- स्टूडंट्स ११, मेंबर्स सुपर ११, सामनावीर- केतन रहाटे, सोहन चुंबळकर, मंदार गाडगीळ, वरद पटवर्धन, अनिश गांगण. मालिकावीर- सोहन चुंबळकर. याप्रसंगी स्वयंसेवक व स्पर्धांमधील पंच यांचा प्रातिनिधीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उज्ज्वला क्लासेसच्या वतीने या वेळी काही बक्षीसे पुरुषोत्तम पाध्ये व सीए शरद वझे यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ सीए, ज्येष्ठ करसल्लागार, कर्मचारी, सीए वैभव देवधर, सीए अभिजित पटवर्धन, सीए मंदार गाडगीळ, सीए श्रीरंग वैद्य, सीए केदार करंबेळकर, सीए अभिलाषा मुळ्ये, सीए शैलेश हळबे आदी उपस्थित होते.