
15 वर्षांनंतर आनंदनगर
rat०६१३.txt
(टुडे पान २ साठीमेन)
फोटो ओळी
-rat६p४.jpg-
८०७४७
रत्नागिरी : थिबा पॅलेसनजीक आनंदनगर येथे बागेचे काम प्रगतीपथावर आहे.
---
आनंदनगरात साकारणार उद्यान...
पंधरा वर्षांची प्रतीक्षा; पालकमंत्री सामंत यांनी दिला निधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : गेली १५ वर्षे सातत्याने थिबा पॅलेस, आनंदनगरधील रहिवासी खुले गटार बंदिस्त करणे व आरक्षित जागेतील उद्यान विकसित करणे यासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांचे हे स्वप्न अखेर सत्यात उतरत आहे. डिसेंबर २२ पासून आरक्षित जागा विकसित करण्याचे काम सुरू आहे. ४२ गुंठे जागेमध्ये विशाल असे उद्यान आधुनिक रचनेसह साकारत आहे. त्यात लहान मुले, स्त्री-पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांच्या विश्रांती व मनोरंजनाच्या दृष्टीने आधुनिक साधनसामग्रीचा प्राधान्याने विचार केला आहे. बटरफ्लाय वॉकिंग ट्रॅक आकर्षक करणे, टुमदार विश्रांतीस्थाने, नयनरम्य हिरवळ व मनमोहक फुलझाडे यांचा समावेश असेल.
आनंदनगर आणि हिंदू कॉलनी येथील बाधित व्यक्तींच्या वतीने श्रद्धा कळंबटे गेली १५ वर्षे ओपन गटार आणि उद्यान विकसित करण्यासाठीचा लेखी पाठपुरावा करत आहेत. अनेक स्थित्यंतरे झाली, परंतु पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने आनंदनगरवासियांना हा विकासनिधी मिळाला. श्रद्धा कळंबटे यांनी मंत्री सामंत यांची चार वेळा भेट घेऊन या प्रश्नाच्या पाठपुरावा केला होता. सामंत यांनी विशेष लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत समाधान व आनंद व्यक्त केला. तसेच तत्कालिन नगरसेवक, नगराध्यक्षांचे आभार मानले.
या उद्यानाला दोन प्रवेशद्वार आहेत. परंतु एक आपद्कालीन छोटे दार असावे, ज्याची जबाबदारी स्थानिक नागरिक घेतील. तसेच या उद्यानाला नाव देताना स्थानिकांना विश्वास घ्यावे, अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. भविष्यात बागेची निगा व्यवस्थित राखली जाईल, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले. या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी अॅड. डिंगणकर, अॅड. मिलिंद पिलणकर, प्रभाकर भिंगार्डे, गणपत घाडगे, सुवर्णा चौधरी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, वृंदा कुलकर्णी, राजेश भुर्के, श्वेता भुर्के, डॉ. प्रिया यादव, मंगेश वेतोस्कर, संतोष तारी, किशोर यादव, देवेंद्र झापडेकर, राजन नेने, गुरुप्रसाद फाटक, सुहास फुटाणे आदी सहकार्य करत आहेत.
--
दोन गटारे बंदिस्त करावीत
उद्यान विकसित करताना या जागेवरील पूर्वीचा वहाळ पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य आता संपुष्टात आले आहे. परंतु या उद्यानाच्या दोन बाजूंची गटारे अजून बंदिस्त केलेली नाहीत. ती लवकरात अतिवृष्टी आणि संभाव्य नगर विकासाच्या दृष्टीने खोल व रुंद करून मगच बंदिस्त करण्यात यावीत, अशी जनतेची मागणी आहे. स्थानिक रहिवासी विकसकांना पूर्णपणे सहकार्य करीत आहेत. परंतु नगरपालिका व विकसक यांनीही इथल्या जनतेला विश्वासात घेऊन पारदर्शीपणे संपूर्ण प्रकल्प पूर्ण करावा. कारण जनतेसाठी जनतेच्याच पैशांतून ही विकासकामे होत असतात, असे येथील नागरिकांनी सांगितले.