भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबोळी’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबोळी’ प्रथम
भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबोळी’ प्रथम

भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबोळी’ प्रथम

sakal_logo
By

80761
सुकळवाड ः स्वरधारा मंडळाने भजन सादर केले.

भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबोळी’ प्रथम

जिल्हास्तर स्पर्धा; सुकळवाडमध्ये हरिनाम सप्ताह उत्साहात

सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः श्री ब्राह्मण देव सेवा समिती, सुकळवाड आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ, तांबोळी प्रथम, सद्‌गुरू प्रासादिक भजन मंडळ वडखोल द्वितीय, तर नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ, कसालने तृतीय क्रमांक पटकावला.
श्री ब्राह्मण देव सेवा समितीच्या वतीने श्री देव ब्राह्मणाच्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त काल (ता. ५) जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील सहा नामवंत भजन मंडळांनी सहभाग घेतला. स्पर्धेची सुरवात नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ, कसालचे बुवा सुंदर मेत्री यांच्या भजनाने झाली. सर्व मंडळांच्या उत्तम सादरीकरणाने ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार झाली. भजनप्रेमींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत बुवा सुंदर मेत्री (कसाल), चेतन तळगावकर (तळगाव), संकेत मेत्री (कट्टा), सिद्धेश नाईक (तुळस), पुरुषोत्तम परब (वडखोल), अमित तांबोळकर (तांबोळी) यांनी सहभाग घेतला. संगीत विशारद बुवा अजित गोसावी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
रंगतदार अशा झालेल्या या भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ, तांबोळीचे बुवा अमित तांबुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सद्‌गुरू प्रासादिक भजन मंडळ वडखोलचे बुवा पुरुषोत्तम परब यांनी द्वितीय, तर नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ, कसालचे बुवा सुंदर मेस्त्री यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट कोरस म्हणून समर्थ प्रासादिक भजन मंडळ कट्टा, उत्कृष्ट पखवाज म्हणून पांडुरंग परब, तर उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून बुवा सिद्धेश नाईक यांना गौरविण्यात आले. सर्व सहभागी मंडळांना रोख मानधन व प्रमाणपत्र दिले. यावेळी स्पर्धा पुरस्कर्ते राजन पावसकर, सरपंच युवराज गरुड, ब्राह्मणदेव सेवा समिती अध्यक्ष अनिल पालकर, उपाध्यक्ष प्रकाश राऊळ, सचिव किशोर पेडणेकर, कोषाध्यक्ष संतोष पाताडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव मसूरकर, ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विलास पेडणेकर, रुपेश गरुड, नागेश पाताडे, बाळा टेंबुलकर, विलास मसूरकर, संतोष बिलये, प्रल्हाद वायंगणकर, भाऊ पाताडे, देविदास प्रभुखोत आदी उपस्थित होते. स्पर्धा मार्गदर्शक अरुण पालकर, परीक्षक अजित गोसावी आदी उपस्थित होते.