निरवडेच्या गौरी पारकरचे राज्य भजन स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरवडेच्या गौरी पारकरचे
राज्य भजन स्पर्धेत यश
निरवडेच्या गौरी पारकरचे राज्य भजन स्पर्धेत यश

निरवडेच्या गौरी पारकरचे राज्य भजन स्पर्धेत यश

sakal_logo
By

80782
गौरी पारकर

निरवडेच्या गौरी पारकरचे
राज्य भजन स्पर्धेत यश
सावंतवाडी, ता. ६ ः महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या विद्यमाने नुकत्याच झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत तालुक्यातील निरवडे गावची कन्या गौरी पारकर ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. तिला कुटुंबीयांचे मार्गदर्शन लाभले.
गौरी ही निरवडे गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तिला लहानपणापासून गायनाची आवड असल्यामुळे तिने बुवा विजय माधव यांच्याकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. तिच्याबरोबर तिचा भाऊ पखवाज वादक सहदेव पारकर याने आनंद मोर्ये यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे घेतले. त्यानंतर या दोघांनीही आपल्या मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा सुरू केली. त्या दोघांचेही शालेय शिक्षण मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी ज्युनियर कॉलेजमध्ये झाले. तसेच झांजवादक असलेली तिची बहिण अंकिता हिनेही या यशात महत्त्वाचे योगदान दिले. तिच्या दोन काकी सावित्री पारकर व रोहिणी पारकर, भजनी बुवा असलेले काका लक्ष्मण पारकर यांनी तिला मार्गदर्शन केले. काका लक्ष्मण यांच्याकडून तिने हा भजनी वारसा पुढे सुरू ठेवला आहे. पडवे-माजगाव येथील विजय माधव यांच्या शिष्या चैताली देसाई, वैशाली देसाई, संजना देसाई, ईशा पवार, सुहासिनी देसाई या सर्वांनी कोरस यांच्यासह तसेच पखवाज विशारद प्राजक्ता परब यांनी मोलाची साथ दिली. सध्या गौरी ही शास्त्रीय संगीताचे धडे संगीत अलंकार वीणा दळवी यांच्याकडे घेत आहे.