दाभोळ-दापोलीत तब्बल चार वर्षांनी होणार आमसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोलीत तब्बल चार वर्षांनी होणार आमसभा
दाभोळ-दापोलीत तब्बल चार वर्षांनी होणार आमसभा

दाभोळ-दापोलीत तब्बल चार वर्षांनी होणार आमसभा

sakal_logo
By

दापोली पंचायत समितीची
तब्बल चार वर्षांनी आमसभा
दाभोळ, ता. ६ ः दापोली पंचायत समितीची २०२२-२३ ची आमसभा आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली १३ फेब्रुवारीला तब्बल ४ वर्षांनी होणार आहे.
दापोलीत सत्तांतर होऊन योगेश कदम आमदार झाले. तरीही पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता होती. ही सत्ता पाच वर्षे अबाधित राहिली. त्यामुळे सभापती एका पक्षाचे तर आमदार दुसऱ्या पक्षाचे असे राजकीय समीकरण होते. त्यातच कोविडचा काळ असल्याने ४ वर्षे आमसभा होऊ शकली नाही. याच कालावधीत राष्ट्रवादीचे तत्कालीन सभापती रऊफ हजवानी यांनी पदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्यात आला होता. त्यामुळे शिवसेनेतील काही सदस्यांच्या मदतीने रऊफ हजवानी यांचा विरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या योगिता बांद्रे या सभापती व शिवसेनेचे मनोज भांबिड उपसभापती झाले होते. त्यानंतर २०२० ते २२ या काळात आमसभाच झाली नाही. आता १३ फेब्रुवारीला दुपारी ११ वा. दापोली शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत १७ जुलै २०१९ ला झालेल्या आमसभेचे इतिवृत्त कायम करणे, मागील सभेतील कार्यवाहीचा आढावा घेणे, २०२१-२०२२ मध्ये केलेल्या विकासकामांचा आढावा घेणे आदी कामकाज होणार आहे.