प्रत्येकाने रक्तदान करायलाच हवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येकाने रक्तदान करायलाच हवे
प्रत्येकाने रक्तदान करायलाच हवे

प्रत्येकाने रक्तदान करायलाच हवे

sakal_logo
By

80790
वेर्ले ः येथील रक्तदान शिबिर कार्यक्रमात डॉ. संजीव लिंगवत व संदेश गोसावी यांचा गौरव करताना मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव लिंगवत, प्रसाद गावडे. शेजारी सतीश लिंगवत, प्रकाश तेंडोलकर, गोविंद लिंगवत, सरपंच रुचिता राऊळ, बाबली गवंडे, रवींद्र तावडे आदी.

प्रत्येकाने रक्तदान करायलाच हवे

डॉ. संजीव लिंगवत ः वेर्लेतील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी, ता. ६ ः रक्तदान हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठदान आहे. ते प्रत्येकाने करायलाच हवे. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान जिल्ह्यात करत असलेल्या कार्याला आणि त्यांच्या टीमला सलाम आहे. मी जी काही समाजसेवा करत आहे आणि त्या सेवेबद्दल माझ्या घरच्या मंडळींनी माझा जो गौरव केला तो खरच मला उभारी देणार आहे, अशा शब्दात वेंगुर्ले येथील जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत यांनी स्पष्ट केले.

वेर्ले येथील श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळ व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने गावात रक्तदान शिबिर घेण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य सेवेत योगदान देणारे डॉ. लिंगवत व गिर्यारोहक संदेश गोसावी यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, ‘‘माझ्या घरच्या लोकांनी केलेला हा सत्कार आहे. खरंतर मी सामाजिक भावनेतून काम करत आहे. हे काम मी जे करत आहे ते म्हणजे परमेश्वराने आपल्याला समाजसेवा करण्यासाठीच पाठवले आहे आणि ते कार्य आम्ही करत आहोत.’’ यावेळी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, तालुका सचिव बाबली गवंडे, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अॅड. संतोष सावंत, सरपंच रुची राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, मंडळाचे सल्लागार गोविंद लिंगवत, लाडजी राऊळ, मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव लिंगवत, उपाध्यक्ष अजित राऊळ, सचिव प्रसाद गावडे, सतीश लिंगवत, सुनील राऊळ, संदीप राऊळ, अनिल गावडे, सुरेश गावडे, अशोक गोसावी, संदेश गोसावी, रवींद्र मेस्त्री, शरद राऊळ, प्रशांत घोगळे, मधुकर लिंगवत, सचिन राऊळ, प्रकाश मर्गज, पंढरी राऊळ, चंद्रकला गोसावी, पल्लवी राणे, महादेव जंगम, रवींद्र तावडे, डॉ. सई लिंगवत, डॉ. विष्णू खरात, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, अनिल खाडे, संजय पालकर आदी उपस्थित होते. अॅड. सावंत म्हणाले, ‘‘श्री देव बादेकर ग्रामविकास मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. या भागातील तरुण आणि एकत्र येऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे आणि गावाच्या विकासाला हातभार लावत आहेत.’’ यावेळी डॉ. सौ. लिंगवत व श्री. गवंडे यांनी विचार मांडले. श्री. गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.
--
...तर तातडीने रक्तपुरवठा
यावेळी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष तेंडोलकर म्हणाले, ‘‘सह्याद्री पट्ट्यातील हा भाग नद्या, निसर्गाने व्यापलेला आहे. या भागातील माणसे खूप प्रेमळ आहेत. सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान प्रत्येक गावागावात रक्तदान शिबिर घेऊन एक जनजागृती करत आहे आणि येत्या काळात प्रत्येक घराघरातील व्यक्ती रक्तदान कसे करेल, या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. तुम्ही कधीही हाक मारा, तुम्हाला राज्यभरात कुठेही रक्त उपलब्ध करून देण्यास आमची टीम समर्थ आहे.’’