
राजपथावर संचलन
rat०६२४.txt
(पान २ साठी फ्लायर)
फोटो ओळी
--rat६p१५.jpg-
८०७७४
रत्नागिरी ः राजपथ संचलनात सहभागी सौरभ लघाटेचा सत्कार करताना र. ए. सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी. डावीकडून डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. अरुण यादव, डॉ. मकरंद साखळकर, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी आदी.
--
राजपथावर संचलन करण्याचे स्वप्न झाले साकार
सौरभ लघाटे ; युनिटचा किसाब स्वीकारणे अभिमानास्पद
मकरंद पटवर्धन ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलन करताना उर भरून आला. कारण, लहानपणी टीव्हीवर हे संचलन पाहून एक दिवस येथे संचलन करेन, असे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साकार झाले. २-३ अंश सेल्सियस गोठवणारे थंडीचे वातावरण वेगळेच होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चमूला ८१२ गुणांसह पंतप्रधान चषक (प्राईम मिनिस्टर बॅनर) देऊन गौरवण्यात आले आणि २ महाराष्ट्र नेव्हल युनिटला मोस्ट एंटरप्रायजिंग नेव्हल युनिटचा किताब मिळाला. मला हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळाली, हे खूपच अभिमानास्पद आहे, असे कॅडेट कॅप्टन सौरभ लघाटे याने ''सकाळ''शी बोलताना सांगितले.
दिल्लीतील प्रजासत्ताक दिन व कार्यक्रम आटपून सौरभ रत्नागिरीत दाखल झाला. सौरभच्या या यशाबद्दल त्याचा सत्कार र. ए. सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी केला. त्याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला, गेल्या वर्षी मला दिल्लीत राजपथ संचलनापर्यंत जाता आले; परंतु शेवटच्या क्षणी संधी हुकली. या वर्षी ही संधी मला मिळाली. सप्टेंबरपासून प्रजासत्ताक दिन संचलनाची शिबिरे सुरू झाली. कोल्हापूरमध्ये ३, पुण्यामध्ये ७ शिबिरे झाली. यात ७०० छात्रांमधून १११ जणांची निवड संचलनासाठी झाली. २९ डिसेंबरला दिल्लीला रवाना झालो.
सौरभने सांगितले, पहाटे ४ वा. उठून दिनक्रमाला सुरवात व्हायची. दररोज शिस्तबद्ध संचलनाचा सराव, स्पर्धा व्हायच्या. करिअप्पा ग्राउंडवर पश्चिम विभागाच्या टीमनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलामी देण्यासाठी पंतप्रधान रॅली काढली. यात मला सहभागी व्हायची संधी मिळाली. नंतर मुंबईत मेजर जनरल, एडीजी, एनसीसी डायरेक्टर वाय. पी. खंडुरी यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या टीमचा सत्कार करण्यात आला. सौरभ सध्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेत (६ इंग्रजी) शिकतोय. गेल्या वर्षी ओव्हरसीज डिप्लॉय या इजिप्त, ओमान, सौदी अरेबियासह पाच देशांत भारतीय नौसेनेसोबत झालेल्या शिबिरातही सौरभने चमकदार कामगिरी केली होती. २ महा. नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार, चिफ इन्स्ट्रक्टर हृषिकांत तिवारी, पीआय स्टाफ, एनसीसी अधिकारी प्रा. अरुण यादव, डी. डी. सरदेसाई, सीमा कदम तसेच आई सुप्रिया, वडील संजय लघाटे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सौरभने सांगितले.
---
संरक्षण मंत्र्यांसमोर शिपमॉडेलचे सादरीकरण
सौरभ व टीमने शिप मॉडेलिंग स्पर्धेसाठी साकारलेल्या आयएनएस त्रिखंड या बॅटरी ऑपरेटेड शिप मॉडेलचे सादरीकरण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर केले. शिप मॉडेल स्पर्धेत प्रथम कर्नाटक-गोवा, द्वितीय राजस्थान व महाराष्ट्राला तृतीय क्रमांक मिळाला. भारतीय नौसेना प्रमुख अॅडमिरल राधाकृष्ण हरीकुमार यांनीही छात्रांचे कौतुक केले.