क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

sakal_logo
By

rat०६३९.txt

(पान ४ साठी)

खारी अपघातप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा

खेड ः तालुक्यातील नांदगाव खारीनजीक दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या रिक्षाचालकावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ फेब्रुवारीला घडली होती. यामध्ये दोघे जखमी झाले होते. या प्रकरणी सुनील देवळे याने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एजाज खेडेकर (रा. भोस्ते) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. सुनील देवळे व त्याचा मित्र अनिकेत दिवाळे हे दोघे सकाळच्या सुमारास कॉलेजला जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाने धडक देऊन अपघात केला होता. यामध्ये दोघेजण जखमी झाले होते. असे पोलिसांनी सांगितले.
------------

मोटार रिक्षाचा अपघात
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कारने रिक्षाला धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात ४ फेब्रुवारीला सांयकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला होता. रवी अर्जुन मस्तुद (रा. पुणे) असे त्या कारचालकाचे नाव आहे. महामार्गावरील कशेडी शिंदेवाडीनजीक एका ट्रकला ओव्हरटेक करत असताना कारचालकाने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक उमेश प्रभाकर सावंत (रा. कशेडी दरेकरवाडी) यांच्या रिक्षाचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

--