रत्नागिरी- निशा आंबेकर यांना 6 पदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- निशा आंबेकर यांना 6 पदके
रत्नागिरी- निशा आंबेकर यांना 6 पदके

रत्नागिरी- निशा आंबेकर यांना 6 पदके

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat६p२९.jpg-KOP२३L८०८८५ गोवा : पॅसिफिक मास्टर्स असोसिएशन इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या सौ. निशा आंबेकर यांना पारितोषिक प्रदान करताना मान्यवर.

राष्ट्रीय स्तरावर सायकल स्पर्धेत
निशा आंबेकर यांना ६ पदके
रत्नागिरी, ता. ६ : पॅसिफिक मास्टर्स असोसिएशन इंडियातर्फे गोवा येथे बांबोलीम स्टेडिअम आणि पेडेम स्टेडिअमवर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा रोजी आयोजित स्पर्धेमध्ये करसल्लागार सौ. निशा आंबेकर यांनी सुवर्ण, रौप्य व कास्य अशी ६ पदकांची लूट केली. थाळीफेकमध्ये सुवर्ण, भालाफेक, हॅमर थ्रो, १०० मी आणि ४०० मी. रिलेमध्ये ४ रौप्य आणि गोळफेकमध्ये कास्यपदक पटकावले. त्यांनी मिळवलेल्या या स्पृहणीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेमध्ये सर्व राज्यातील ३० ते ८० वयोगटातील खेळाडू सहभागी होते. अत्यंत कठीण अशा क्रीडा प्रकारांत त्यांनी अत्यंत सरस कामगिरी करत सौ. निशा आंबेकर यांनी यश मिळवले. या व्यवसायाने करसल्लागार आहेत. शाळा- कॉलेज जीवनापासूनच त्यांना खेळाची आवड असून त्यांनी जिल्हा, राज्य, युनिव्हर्सिटी, इंटर युनिव्हार्सिटी स्तरावर अॅथलेटिक्समध्ये पदके मिळवली. १००, २००, ४०० मी. धावणे, थाळीफेक, गोळफेक, हॅमर थ्रो आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांनी यश मिळवले आहे. त्या १८ वर्षे करसल्लागार म्हणून कार्यरत असून २२ वर्षानंतर पुन्हा फिटनेससाठी त्यांनी सायकलिंग आणि खेळाचा सराव सुरू केला. गेल्या महिन्यात शिर्डी येथे झालेल्या खेलो मास्टर्स अंतर्गत अॅथलेटिक्समध्ये ५ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कास्यपदक मिळवले आहे.