
संत रोहिदासांना सावंतवाडीत वंदन
80921
सावंतवाडी ः येथील जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळातर्फे येथील समाज मंदिर सभागृहात संत रोहिदासांना अभिवादन करण्यात आले.
संत रोहिदासांना सावंतवाडीत वंदन
सावंतवाडी ः संत रोहिदास यांची जयंती सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सावंतवाडी शाखेतर्फे येथील समाज मंदिर सभागृहात झाली. समाज मंदिर येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर आणि सचिव गुंडू चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण यांनी संत रोहिदास यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्याचे पैलू सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांनी उलगडून दाखवले. यावेळी तालुका शाखेचे अध्यक्ष गणेश म्हापणकर, सचिव गुंडू चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सल्लागार बाबुराव चव्हाण, सदानंद चव्हाण, लक्ष्मण आरोसकर, संदीप बिबवणेकर, सूर्यकांत सांगेलकर, माजी अध्यक्ष ओम प्रकाश तीवरेकर, शेखर दाभोलकर, जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, विनायक चव्हाण, विजय ओठवणेकर, सुधाकर बांदेकर, मंगेश कदम, माजी नगरसेवक विलास जाधव आदी उपस्थित होते. संत रोहिदास यांच्या प्रतिमेला अध्यक्ष म्हापणकर यांनी पुष्पहार अर्पण केला. माजी जिल्हाध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी संत रोहिदास यांच्या तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीवर केलेल्या कार्याची माहिती दिली. सचिव गुंडू चव्हाण यांनी आभार मानले.