मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मार्चमध्ये प्रशिक्षण शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी 
मार्चमध्ये प्रशिक्षण शिबिर
मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मार्चमध्ये प्रशिक्षण शिबिर

मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मार्चमध्ये प्रशिक्षण शिबिर

sakal_logo
By

मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी
मार्चमध्ये प्रशिक्षण शिबिर
तळेरे, ता. ७ : मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ९ ते ११ मार्च या कालावधीत ३ दिवसीय विनामूल्य मराठी साहित्य निर्मिती, कौशल्य, सादरीकरण आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने या पंधरावड्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचा अभ्यास करत जे मुस्लिम विद्यार्थी मराठीमध्ये अभिव्यक्त होऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना साहित्य निर्मिती प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन, प्रशिक्षण, सादरीकरण आणि कौशल्यवाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी तीन दिवसीय निवासी शिबिर औरंगाबाद येथे आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये अनेक नामवंत साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, कवी, गझलकार, नाटककार, विचारवंत आणि वक्ते या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ करणार आहे. मुस्लिम मराठी विद्यार्थ्यांनी आपली नावे २८ फेब्रुवारीपर्यंत कळवावीत. अधिक माहितीसाठी प्रा. लियाकत अली पटेल, शेख अन्वर जावेद (सचिव, मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.