निवृत्त कर्मचाऱ्यांची रत्नागिरीत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त कर्मचाऱ्यांची रत्नागिरीत बैठक
निवृत्त कर्मचाऱ्यांची रत्नागिरीत बैठक

निवृत्त कर्मचाऱ्यांची रत्नागिरीत बैठक

sakal_logo
By

निवृत्त कर्मचाऱ्यांची
रत्नागिरीत बैठक
रत्नागिरीः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी तालुक्यातील निवृत्त व स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीसंदर्भात महत्वाची बैठक १२ फेब्रुवारीला सकाळी ११ वा. माध्यमिक अध्यापक कर्मचारी पतसंस्था साळवी स्टॉप रत्नागिरी येथे होणार आहे. या सभेत ४ नोव्हेंबरला दिल्ली सुप्रिम कोर्ट यांनी पेन्शवाढीसंदर्भात निकाल दिला आहे. पेन्शनवाढीसंदर्भात राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी सोनावणे आणि रोहकळे यांनी गेल्या महिन्यातील सभेत फॉर्मेट बी व सी मध्ये प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी वैयक्तिक फॉर्म भरावयाचे आहेत. त्यासाठी पीपीओ नंबर, आधारकार्ड, पेन्शन जमा होत असलेल्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पीएफ कोड नंबर, पॅनकार्ड यांच्या झेरॉक्स प्रती किंवा मुळ प्रती आणावयाच्या आहेत तसेच पीएफ ऑफिसकडून आलेली मुळ प्रत आणावयाची आहे. रत्नागिरी तालुक्यातील पेन्शनधारकांनी या सभेला हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष रामचंद्र गंगाराम भोजे यांनी केले आहे. तालुकानिहाय बैठका घेण्यात येणार असून, त्याचे नियोजन संघाचे संचालक करणार आहेत.
-----
लोकलला महोत्सवात
आज विविध कार्यक्रम
चिपळूण ः लोककला महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (ता. ८) विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये सकाळी १० वा. नमनाचा अनुबंध, ११.४५ वा. शाश्वत पर्यटन, हे दोन परिसंवाद होतील. सायंकाळी ६ वा. गाऱ्हाणे, कातकरी, मुस्लिम गीते आणि खालू बाजा, जलसा, वैदिक लग्नगीते, घोरीप आणि महिला दशावतार (सिंधुदुर्ग) या लोककला सादर होणार आहेत.