शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी
शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी

शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी

sakal_logo
By

शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी
सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (५ वी) ४४ व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षासाठी (इयत्ता ८ वी) २९ केंद्रे, असे एकूण ७३ केंद्रावर रविवारी (ता.१२) शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी ही माहिती दिली. पाचवीसाठी ३ हजार ७९९ व आठवीसाठी २ हजार १९२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्र (हॉलतिकीट) परीक्षेच्या ठिकाणी अनिवार्य आहे. पेपर क्रमांक -१ सकाळी ११ ते दुपारी १२.३०, पेपर क्रमांक-२ दुपारी २ ते ३.३० वाजता होईल. दोन सत्रात परीक्षा होणार आहे. याबाबतची नोंद सर्व पालक, विद्यार्थी यांनी घ्यावयाची असून, कोणतीही शंका असल्यास जवळच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय तसेच केंद्रशाळामध्ये संपर्क करावा. विद्यार्थ्यांनी परीक्षेला संबंधित परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी किमान ३० मिनीट अगोदर उपस्थित राहावे.