कणकवली ‘उडान’ महोत्सवात वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली ‘उडान’ महोत्सवात
वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे यश
कणकवली ‘उडान’ महोत्सवात वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे यश

कणकवली ‘उडान’ महोत्सवात वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे यश

sakal_logo
By

81151
पणदूर ः संस्था कार्याध्यक्ष शशिकांत अणावकर, प्रा. डॉ. संभाजी शिंदे यांच्यासह पथनाट्यातील विद्यार्थी.

कणकवली ‘उडान’ महोत्सवात
वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे यश
कुडाळ ः पणदूर येथील वेंगुर्लेकर महाविद्यालयाने ‘उडान’ महोत्सवात सुयश प्राप्त केले. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत कणकवली महाविद्यालय, कणकवली शुक्रवारी (ता. ३) ‘उडान महोत्सव २०२३’ (सिंधुदुर्ग विभाग) पार पडला. यात वक्तृत्व, सर्जनशील लेखन आणि पोस्टर मेकिंग या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पणदूर महाविद्यालयाच्या टीवाय बीबीआय व एसवाय बीबीआयच्या वर्गातील १४ विद्यार्थ्यांनी पथनाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन ''कोरोना'' या विषयावर पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. याबद्दल सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग प्रमुख प्रा. भाग्यश्री गावडे, प्रा. मृणालिनी कुडतरकर, प्रा. संचिता कोलापटे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे, दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे कार्याध्यक्ष शशिकांत अणावकर, इतर सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
------
81152
नेरुर ः येथे संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

संत रोहिदासांना नेरुरमध्ये वंदन
कुडाळ ः नेरुर ग्रामपंचायत देऊळवाडा येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामसेवक वासुदेव कसालकर, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नेरुर आदर्शनगर येथील रहिवासी रामकृष्ण नेरुरकर, उमेश निव्हेकर, संतोष चव्हाण, सोनाली चव्हाण, यश चव्हाण, रोशन चव्हाण, विनायक चव्हाण, पंकज चव्हाण, स्नेहल चव्हाण आदी उपस्थित होते.