Tue, March 28, 2023

करूळ घाटात टेंपो उलटला
करूळ घाटात टेंपो उलटला
Published on : 7 February 2023, 2:05 am
81171
करूळ ः घाटात उलटलेला टेंपो.
करूळ घाटात टेंपो उलटला
वैभववाडी, ता. ७ ः ब्रेक निकामी झाल्यामुळे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास टेंपो पलटी झाला. त्यामुळे काही काळ घाटरस्त्यातून एकेरी वाहतुक सुरू होती. दुपारनंतर टेंपो रस्त्यावरून हटविण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
गगनबावड्याहून वैभववाडीकडे येत असलेल्या टेंपोचे करुळ घाटात ब्रेक निकामी झाले. ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने टेंपो थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु एका वळणावर तो पलटी झाला. यामध्ये टेंपोचे मोठे नुकसान झाले. रस्त्याकडेला हा टेम्पो पलटी झाल्यामुळे काही काळ या घाटरस्त्यातून एकेरी वाहतूक सुरू होती. दुपारी टेंपो बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.