‘दिगंबरा दिगंबरा’चा माणगावात गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दिगंबरा दिगंबरा’चा माणगावात गजर
‘दिगंबरा दिगंबरा’चा माणगावात गजर

‘दिगंबरा दिगंबरा’चा माणगावात गजर

sakal_logo
By

81165
माणगाव ः येथील दत्त मंदिर परिसर भक्तांनी परिसर फुलून गेला होता.

‘दिगंबरा दिगंबरा’चा माणगावात गजर

रुद्र दत्तयाग; जिल्ह्यासह मुंबई, पुण्यातील भाविकांची उपस्थिती

माणगाव, ता. ७ ः ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या नामजपाने अवघी माणगावनगरी दुमदुमून गेली. दत्त मंदिरात श्री रुद्र दत्तयाग भक्तिमय वातारणात असंख्य भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. या सोहळ्यास भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्यामुळे मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता.
दत्त मंदिरात गुरुप्रतिपदेपासून श्री रुद्र दत्तयाग सोहळा सलग तीन दिवस सुरू होता. प. पू. नांदोडकर स्वामी महाराजांनी या उत्सवाची सुरुवात केली आणि त्यानंतर प्रतिवर्षी माणगाव दत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून हा उत्सव सुरू आहे. आद्यशंकराचार्य यांनी पंचायतनाची स्थापना केली. गणेश, विष्णू, शंकर, सूर्य आणि देवी आणि यावरूनच प्रत्येकाच्या नावावरून दरवर्षी माणगाव दत्त मंदिरात याग केला जातो. यावर्षी श्री रुद्र दत्तयाग सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे नियोजन होते. यामध्ये धार्मिक विधी, आरती, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, नामस्मरण, अभिषेक पूजा, पुण्याहवाचन, यज्ञ मंडप, देवता स्थापना, ग्रहवास्तू, हवनादीक धार्मिक विधी, गुहेवर सत्यदत्त पूजा, श्री रुद्र दत्तयाग, बलिदान, पुर्णाहूती, महानैवेद्य, आरती, सायंकाळी प्रतिदिन पालखी सोहळा आदी कार्यक्रमांचा समावेश होता. या सर्व कार्यक्रमांना भक्तांनी मोठी उपस्थिती दर्शविली. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा या रुद्र दत्तयाग कार्यक्रमासाठी जिल्हाभरासह मुंबई, पुणे तसेच गुजरात राज्यातूनही भक्तांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिर फुलांनी सजविले होते. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईही होती. भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन व्हावे, यासाठी नीटनेटके नियोजन केले होते. भक्तांची वाढती संख्या विचारात घेऊन पार्किंगची उत्कृष्ट व्यवस्था ट्रस्टने केली होती.