
रत्नागिरी- रत्नागिरीत मधुमेह नियंत्रण शिबिराचे आयोजन
पान ५ साठी
मधुमेह नियंत्रण शिबिराचे
रत्नागिरीत आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः येथील बाळासाहेब पित्रे योगप्रशिक्षण व संशोधन केंद्र व घंटाळी मित्रमंडळ (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह नियंत्रण शिबिराचे आयोजन ६ मार्चपासून केले आहे. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये सभागृह दोन महिने शिबिर होणार आहे.
घंटाळी मित्रमंडळाद्वारे सुमारे १५ वर्षे मधुमेह नियंत्रण वर्ग चालवला जात आहे. एस. व्यास (बंगळूर) यांनी आखणी केलेल्या मधुमेह नियंत्रण मोहिम अभ्यासक्रमाद्वारे योगवर्ग घेतला जातो. हाच वर्ग आता रत्नागिरीत सुरू होणार आहे. घंटाळी मित्रमंडळाचा हा ७०वा वर्ग आहे. मधुमेह झाला की, त्यामधून अन्य प्रकारच्या अनेक व्याधी शरीरात निर्माण होतात. त्यासाठी मधुमेह नियंत्रणात ठेवणे, नियमित आहारविहार आणि औषधे घेणे आवश्यक होते. मधुमेहाला घाबरून न जाता योगसाधना आणि योग्य आहार, औषधे या द्वारे मधुमेह आणि त्यामधून उद्भवणाऱ्या व्याधी नियंत्रणात ठेवणे हे या वर्गाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नियमित करायची योगसाधना शिकवली जाते तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, ताण कमी करण्यासाठीची साधना, आहाराबाबत मार्गदर्शन केले जाते. हा वर्ग ६ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. शिबिरामध्ये मधुमेह झालेला रुग्ण अथवा अनुवंशिकता किंवा अन्य कारणामुळे मधुमेह होण्याचा संभाव्य धोका असलेली व्यक्ती सहभागी होऊ शकतात. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी अॅड. रूची महाजनी, डॉ. रंजना केतकर, मृणाल भावे, विश्वास वाडेकर यांच्याशी संपर्क साधावा.