स्त्रीच्या मूळाशी असणारी वेदना तिच्या गीतांमधेही

स्त्रीच्या मूळाशी असणारी वेदना तिच्या गीतांमधेही

rat0737.txt

( पान 5 साठी)

फोटो ओळी
-rat7p36.jpg ः
81188
चिपळूण ः येथील महोत्सवात लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती या परिसंवादाआधी डॉ. निधी पटवर्धन यांचा सत्कार करताना अंजली बर्वे. सोबत परिसंवादातील सहभागी वक्ते.
--
स्त्रीच्या मूळची वेदना तिच्या गीतात

डॉ. निधी पटवर्धन ; लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा अमनोल ठेवा

चिपळूण, ता. ८ ः स्त्री गीते उपमांचे भांडार आहे. विधी, श्रम अणि खेळ या अनुषंगाने स्त्री गीतांमध्ये नृत्यही येते. इतिहास, समाज, नाती-गोती याची महती सांगणारी ही गीते असून लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या स्त्री गीतांचा हा अनमोल ठेवा जपायला हवा, असा आग्रही सूर लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती या परिसंवादातून उमटला.
येथील महोत्सवात परिसंवादामध्ये डॉ. निधी पटवर्धन यांनी स्त्रीच्या मूळाशी असणारी वेदना तिच्या गीतांमधून दिसते असे सांगितले. शरीर रंजनासाठी असले तरी आत्मा प्रबोधनासाठी आहे. कुटुंब, वात्सल्य, प्रेम बांधून ठेवणं हे स्त्री गीतांचे वैशिष्ट्य आहे, असे सांगत त्यांनी कोणत्या लोककलामध्ये महिलांना स्थान आहे व कोणत्या धार्मिक विधी, लोककलांमध्ये स्थान नाही, याची विस्तृत माहिती दिली. आज पुरुषी वर्चस्व मोडून काढण्याची अभिव्यक्ती महिला निर्माण करीत आहेत. तशीच लावणी ही लोककला पुरुष सादर करुन उलटी अभिव्यक्ती होत असल्याचे त्यांनी सोदारण सांगितले.

डॉ. अरविंद काजरेकर यांनी स्त्री गीतांमधील अभिव्यक्ती नैसर्गिक असल्याचे मत मांडले. निसर्गाधिष्ट, श्रमाधिष्ट अभिव्यक्तीची रूपे आपल्याला या गीतांमधून दिसून येतात. प्रा. वर्षा फाटक म्हणाल्या,ओव्या या लोककलेचा सौंदर्यपूर्ण आविष्कार आहे. परमेश्वराला सर्व अर्पण करण्याची यात भावना आहे. भोग, निष्कर्ष आणि चिंतन याचे समग्र दर्शन ओवींमधून घडते. सूर, ताल आणि लय याचे भान या महिलेला आहे. अशिक्षित असूनही सूज्ञता तिच्याकडे असल्याचे निरिक्षण नोंदविताना हे सांस्कृतिक धन मनापासून जपायला हवे. अध्यक्ष डॉ. सूर्यकांत आजगावकर म्हणाले, निसर्गाशी, शेती, वनसंस्कृतीशी जोड असणारी ही लोकगीते आज शेती कमी होत असल्याने संपत चालली आहेत. अभिव्यक्तीने ओतप्रोत भरलेली स्त्री गीते, ओवी यावर म्हणावे तसे संशोधन झालेले नाही. पुरुष आणि स्त्रिया यांच्या गीतातील भेद सांगताना स्त्री गीतांमध्ये भाव, नाती, वृत्ती, प्रवृत्तीचे दर्शन घडते, जगणं ही स्त्री गीतांची प्रेरणा आहे.
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com