वाळू वाहतूकप्रकरणी तीन डंपरना दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाळू वाहतूकप्रकरणी
तीन डंपरना दंड
वाळू वाहतूकप्रकरणी तीन डंपरना दंड

वाळू वाहतूकप्रकरणी तीन डंपरना दंड

sakal_logo
By

वाळू वाहतूकप्रकरणी
तीन डंपरना दंड
मालवण, ता. ७ : येथील तहसीलदार श्रीधर पाटील यांनी अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या डंपरपैकी तीन डंपरना प्रत्येकी १ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला. संबंधितांनी आज दंडाची रक्कम भरल्यानंतर तीनही डंपर सोडण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई सुरूच आहे. देवली येथे तसेच अन्य मार्गावर पकडण्यात आलेल्या डंपरवर कारवाई सुरू आहे. तसेच देवली, वायंगणी तोंडवळी फाटा व कांदळगाव या ठिकाणी सापडलेल्या अनधिकृत वाळू साठ्याचे मोजमाप करण्यात आले असून त्यावरही कारवाई सुरू आहे, अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
..............
सावडावात वासराचा
बिबट्याकडून फडशा
कणकवली, ता. ७ : सावडाव-खलांतरवाडी येथील अनंत महादेव शिरवडकर यांच्या गाईचे वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याने वासराच्या गळ्याचा चावा घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याच्या उपद्रवाने सावडाव परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.