‘रोटरी’चे विविध लोकोपयोगी उपक्रम

‘रोटरी’चे विविध लोकोपयोगी उपक्रम

81258
कणकवली ः येथील तहसील कार्यालायाच्या आवारात रोटरी क्लबतर्फे वॉटर एटीएम प्रोजेक्टचे मान्यवराच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

‘रोटरी’चे विविध लोकोपयोगी उपक्रम

गौरीश धोंड ः एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी

कणकवली,ता. ८ ः कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथे शुद्ध पाणी आहे; पण ते लोकांना पिण्यासाठी उपलब्ध व्हायला हवे. म्हणूनच सामाजिक बांधलिकातून कणकवली रोटरी क्लबने एक रुपयात एक लिटर पाणी हा वॉटर एटीएमचा प्रोजेक्ट सुरू केला. रोटरी क्लब विविध लोकोपयोगी उपक्रमापैकी हा एक उपक्रम असून तहसील परिसरात सुरु केला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड यांनी केले.
कणकवली तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मरणीय कार्यालयाच्या परिसरात क्लबने वॉटर एटीएम प्रोजेक्ट सुरू केला आहे. लोकार्पण कार्यक्रमात धोंड बोलत होते. यावेळी श्री. धोंड बोलत होते. यावेळी तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, रोटरी क्लब कणकवलीच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर, सचिव उमा परब, दीपक बेलवलकर, माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, अॅड दीपक अंधारी, डॉ. राजेश पावसकर, राजेश साळगांवकर, शशिकांत चव्हाण, नगरसेविका मेघा गांगण, अशोक करंबेळकर, सुशांत दळवी, राजेश मालविय, सोनू मालविय, भेरराम राठोड, लवू पिळणकर, रवी परब, अरुण मुरकर, महेंद्र मुरकर, माधवी मुरकर, तृप्ती कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी विद्याधर तायशेटे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. दीपक अंधारी यांनी प्रास्ताविक केले. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. दादा कुडतरकर यांनी आभार मानले.
--
मान्यवरांची मनोगते
तहसीदार श्री. पवार म्हणाले, क्लबचा हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे. हा प्रोजक्ट राबविण्यासाठी क्लबने योग्य जागेची निवड केली. रोटरीचे विविध उपक्रम हे सामाजिक बांधलिकी जोपासणारे असतात, त्याचे अनुकरण अन्य सामाजिक संस्थांनी करावे. नगराध्यक्ष श्री. नलावडे म्हणाले, रोटरीचा हा स्तुत्य आहे. शहर किंवा गावागावांत असा उपक्रम राबवाल तर नक्कीच सहकार्य करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com