
जांभरमळात नळपाणी योजना मंजूर
81284
साळगाव ः जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजना कामाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार वैभव नाईक, संजय पडते आदी.
जांभरमळात नळपाणी योजना मंजूर
८६ लाखांचा निधी; आमदार नाईकांच्या हस्ते भूमीपूजन
कुडाळ, ता. ८ ः साळगाव गावातील महसुली गाव जांभरमळामध्ये शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे. त्यामध्ये बोरवेल खोदणे, पाईप लाईन करणे, टाकी बांधणे या कामासाठी ८६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आज या कामाचे भूमिपूजन आमदार यांच्या हस्ते झाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती सावंत यांची प्रमुख उपस्थितीती होती. आमदार नाईक यांनी श्रीफळ वाढवून या कामाचा प्रारंभ केला. शिवसेनेने ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला असून लवकरच हे काम पूर्ण करून जांभरमळा येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे, असे यावेळी आमदार नाईक म्हणाले. याप्रसंगी आमदार नाईक, संजय पडते यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, शाखाप्रमुख हेमंत सावंत, उपशाखाप्रमुख नामदेव तावडे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी सावंत, ग्रामपंचायत सतस्य तेजस्विनी सावंत, मानसी धुरी, सिद्धी मेस्त्री, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शांताराम धुरी, उपाध्यक्ष अविनाश धुरी, युवासेना उपविभागप्रमुख रोहित सावंत, बंड्या कोरगावकर, चेतन सावंत, राकेश धुरी, माजी ग्रामपंचयत सदस्य दत्ताराम लाड, ज्येष्ठ शिवसैनिक सावंत , माजी शाखा प्रमुख गणेश धुरी, बाबा धुरी, शिवाजी टिळवे, संदीप सावंत, रुपाली सावंत, चंद्रावती सावंत, समीक्षा सावंत, नमिता घाग, दीपाली धुरी, रसिका धुरी, जमीन मालक शुभांगी खेमासावंत, सत्यभामा धुरी, दिगंबर सावंत, पूर्वा धुरी, माधवी धुरी आदी उपस्थित होते. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबाबत आमदार वैभव नाईक यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.