मळेवाड रस्ताकामाबाबत 
वेळप्रसंगी उपोषण छेडणार

मळेवाड रस्ताकामाबाबत वेळप्रसंगी उपोषण छेडणार

Published on

मळेवाड रस्ताकामाबाबत
वेळप्रसंगी उपोषण छेडणार

हेमंत मराठे; प्रशासनास निवेदन

सावंतवाडी, ता. ८ ः मळेवाड येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील काम तातडीने सुरू करा; अन्यथा ग्रामस्थांसमवेत उपोषण छेडण्याचा इशारा मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता धामणे यांना तसे निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मळेवाड गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सावंतवाडी-शिरोडा मुख्य रस्ता ते शिरसाटवाडी, भटवाडी रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. तब्बल पावणेदोन कोटी रुपये यासाठी निधी मंजूर आहेत. या कामामध्ये समाविष्ट असलेल्या कामांपैकी संरक्षक भिंती, रस्ता डांबरीकरण, भटवाडी पूल, गटार, पाण्याचे पाईप अशी विविध कामे अपूर्ण आहेत. जी कामे झाली आहेत, त्यांचा दर्जाही निकृष्ट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या योजनेतच जर अशा प्रकारची दिरंगाई होत असतील तर ती शोकांतिका आहे. हे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी योग्य कार्यवाही करावी व कामात अनियमितता करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी; अन्यथा कार्यालयासमोर ग्रामस्थांसमवेत २१ फेब्रुवारीला सकाळी अकराला आंदोलन करू. मागणी पूर्ण न झाल्यास प्रसंगी मंत्रालयात व न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.