प्रवीण काकडे यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

प्रवीण काकडे यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

rat०८१६.txt

बातमी क्र.. १६ (टुडे पान ४ साठी)

फोटो ओळी
-rat८p१.jpg-
८१२४८
पुणे : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना पद्मश्री दादा इदाते. सोबत मान्यवर.
---
प्रवीण काकडेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

रत्नागिरी, ता. ८ ः अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्यावतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे खूप मेहनत घेत आहेत. त्यांनी राज्यातील डोंगरी व दुर्गम भागातील व अतिवृष्टी नुकसान व दरडग्रस्त भागातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री दादासाहेब इदाते यांनी केले.
ईगल फाउंडेशनच्यावतीने काकडे यांना एमआयटी युनिवर्सिटी (कोथरूड, पुणे) येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी दादा बोलत होते. अध्यक्षस्थानी ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलास कोळेकर आणि प्रमुख अतिथी सांगलीचे माजी महापौर प्रा. नितीन सावगावे व सेन्सॉर बोर्ड सदस्य प्रा. डॉ. महेश पाटील उपस्थित होते. काकडे यांनी सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि पुणे या सातही जिल्ह्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव व जंगलातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महापूर व अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागातील व दरडग्रस्त भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. आतापर्यंत ४ हजार २९३ विद्यार्थींना मदत करून काहींना शैक्षणिक फी भरून सहकार्य केले. याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com