दांडी-आवार येथील मंजूर
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

दांडी-आवार येथील मंजूर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

81310
दांडी ः आवार येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

दांडी-आवार येथील मंजूर
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
मालवण ः जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या दांडी आवार येथील बाळा सादये कार्यालय ते मासे सुकवणे रॅम्प पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, मनोज मोंडकर, उमेश मांजरेकर, भाई कासवकर, तपस्वी मयेकर, नरेश हुले, बाबू वाघ, अन्वय प्रभू, मंदार ओरसकर, जगदीश खराडे, सुशांत शेलटकर, परेश वाघ, नरेश कोयंडे, सेजल परब, राजेश हुले, दुमिंग फर्नांडिस, विशाल आचरेकर, रवी कोयंडे, गणपत गावकर, मिकी डिसोझा, इशा गावकर, रवी पारकर, संतोष वायंगणकर, दादू परब, लुईस फर्नांडिस, विष्णू मालंडकर, किरण कोयंडे, राजा शंकरदास, अमित खरात, आनंद परब आदी उपस्थित होते.
---
81312
सावंतवाडी ः स्वरांगी खानोलकर व प्रणिता आयरे या दोघींचा सत्कार करताना बाळासाहेब शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी. बाजूला अन्य.

स्वरांगी खानोलकर, प्रणिता आयरेचा सत्कार
सावंतवाडी ः येथील एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वरांगी खानोलकर हिची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील परेडसाठी निवड झाल्याने, राज्यस्तर कॅरम स्पर्धेत प्रणिता आयरे हिने दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळविल्याबद्दल त्यांचे दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी अभिनंदन केले. प्रशालेच्या वतीने त्यांची शहरातून काढलेल्या मिरवणुकीत मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानासमोर हे स्वागत करण्यात आले. या वेळी गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे, म. ल. देसाई, एकनाथ हळदणकर, विश्वास घाग, सुरेश कदम, सौ. देसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com